नवी दिल्ली, 22 जानेवारी : जगात असे अनेक लोक आहेत जे अतोनात कष्ट करतात. परिस्थिती हालाकिची असतानाही कष्ट करत जगण्याचा आनंद घेतात. परिस्थितीशी दोन हात करत अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. कष्ट आयुष्यभर नशिबाला पुजलंय, त्यातही आनंद घेतानाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांची मन जिंकत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, नवरा बायको उसाच्या गाडीवर बसले आहेत. हे जोडपं ऊस तोडणी कामगार असून ऊस घेऊन चालले आहेत. उसाच्या गाडीत बसून महिला रिल बनवताना पहायला मिळत आहे. महिला हिंदी गाण्यावर रिल बनवत असून व्हिडीओमध्ये ती आणि तिचा नवरा दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहे.
परिस्थिती कशीही असो आनंदात रहायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद शोधायचा, असा संदेश या व्हिडीओमधून मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचं कौतुक करत आहे. अशा परिस्थिती काही लोक रडतात आणि तुम्ही हसत आहे, असे नेटकरी कमेंट करत आहेत. एवढ्या कष्टातूनही तुम्ही आनंदाचा क्षण शोधता यासाठी नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. त्यामुळे कष्ट करणाऱ्यांना आणि त्यांच्या कलांना वाव देणारे व्हिडीओ लोकांच्या मनाला कायमच भिडतात.
दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधत असतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडीओंना नेटकरी नेहमीच पसंती देत असतात.