नवी दिल्ली, 1 ऑगस्ट: एकवेळ अशी होती जेव्हा बहुतांश जण सोशल मीडियावर केवळ फोटो पोस्ट करायचे. पण हल्ली असंख्य व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात बहुतांशी व्हिडिओ हे मनोरंजनात्मक (Entertaining) असतात. अनेकवेळा युजर्सकडून व्हिडिओच्या खाली मजेशीर कमेंटही केल्या जातात. सोशल मीडियाची ताकद सध्या इतकी वाढली आहे की या माध्यमातून उत्तम प्रकारे पैसेही कमवले जात आहेत. सद्यस्थितीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या (Social Media Influencer) भूमिकेत अनेकजण दिसत आहेत. त्यांच्या फॅन्सची संख्याही बरीच मोठी आहे. प्राणी, पक्षी किंवा कुठल्याही व्यक्तीच्या व्हिडिओला गाणी जोडून किंवा स्वत:च्या कल्पकतेनुसार त्याला एडिट (Edit) करून सोशल मीडियावर टाकत फॉलोअर्स (Followers) वाढवण्याची इन्फ्लुएन्सरमध्ये चढाओढ पाहायला मिळते. नुकताच असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल झाला. यात एक सरडा वॉश बेसिनमध्ये (Wash Basin) वर येण्यासाठी धडपड करत असताना त्याला ढोलचा आवाज जोडण्यात आला. त्यामुळे हा सरडा ढोलाच्या तालावर नाचतो आहे की काय, असा भास होतो. या व्हिडिओला अनेक युजर्सनी पसंती दिली. काय दाखवले आहे व्हिडिओत? व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक सरडा वॉश बेसिनमध्ये अडकून पडलेला दिसतो. सुरुवातीला तो शांतपणे थांबलेला असतो. परंतु, नंतर जेव्हा तो वर येण्यासाठी धडपडत असतो तेव्हाच पाठीमागे ढोलचा आवाज जोडण्यात आला आहे. बेसिनमध्ये सरड्याचे पाय घसरत असल्याने तो बाहेर पडू शकत नाही. पण या क्षणाला अचूक हेरत युजरने त्याला पार्श्वसंगीत म्हणून ढोलाचा आवाज दिल्याने तो सरडा जणू ढोलच्या आवाजावर नाचत आहे की काय असे वाटू लागते. त्यामुळेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स Shivam_alfa नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंटही आल्या. बहुतांशी युजर्सनी यावर हसणारी इमोजी (Smiling Emoji) टाकली आहे. अनेकांनी व्हिडिओला अचूक आवाज दिल्याचं म्हटलं आहे. तर हा एक एडिटिंगचा उत्तम नमूना असल्याचं म्हणत व्हिडिओचे अनेकांनी कौतुकही केलंय. हेही वाचा - एका पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी, सर्वात साक्षर राज्यातला धक्कादायक VIDEO दरम्यान, मनोरंजन व्हावं म्हणून सोशल मीडियावर वेळ खर्ची घालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक युजर्स सोशल मीडियावर आयुष्यातील मजेशीर क्षण (Funny Moments) शेअर करतात. विशेष म्हणजे आता कंटेंट बनवून तो शेअर केला जात आहे. कटेंट क्रिएटर्स (Content Creators) म्हणून अनेकांकडे नोकऱ्याही आहेत. जास्तीतजास्त लोकांची पसंती मिळावी असा कंटेंट निर्माण करण्याचं या कंटेंट क्रिएटर्सचं उद्दिष्ट असतं. सरड्याचा हा व्हिडिओही असाच मनोरंजनासाठी निर्माण करण्यात आला असून, त्याला मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.