• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? हा VIDEO पाहून बदलेल मत

कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? हा VIDEO पाहून बदलेल मत

चिंपांझी माकडांचं एक कुटूंब नव्यानं (Viral video of chimpanzee loving baby) जन्मलेल्या बाळासोबत खेळत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  चिंपांझी माकडांचं एक कुटूंब नव्यानं (Viral video of chimpanzee loving baby) जन्मलेल्या बाळासोबत खेळत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्राण्यांना (Emotions of animals) भावना नसतात, असं म्हटलं जातं. मात्र चिंपांझी माकडाच्या या कुटुंबाकडं पाहिल्यानंतर प्राण्यांनाही भावना असतात, याची प्रचिती येते. माकडांचं कुटूंब कशा प्रकारे (Playing with baby) बाळाला खेळवतं हे या व्हिडिओतून दिसतं. कुटुंबासोबत वेळ प्राण्यांमध्ये पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची पद्धत दिसत नाही. प्राण्यांची पिल्लं ही आपसांत खेळत मोठी होताना दिसतात. मात्र एका जंगलात रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ चिंपांझी कशा पद्धतीने आपल्या पिलांवर प्रेम करतो, हे दाखवणारा आहे. पिलासोबत खेळतायत माकडं या व्हिडिओत पिलाची आई त्याला पोटावर घेऊन खेळवत बसली असून दुसरा एका चिंपांझी येऊन त्याच्याशी खेळताना दिसत आहे. एखादा माणूस जसा आपल्या बाळाशी खेळतो, तसंच हे माकड आपल्या पिलांसोबत खेळत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, बाळांच्या बाललीला पाहाव्यात, त्यांच्यासोबत खेळ खेळावेत, असं ज्याप्रमाणं माणसांना वाटतं, त्याचप्रमाणं ते प्राण्यांनाही वाटत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे. हे वाचा-अमरावती हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरूच, प्रवीण पोटेंसह भाजपचे 10 जण अटकेत व्हिडिओला जोरदार प्रतिसाद या व्हिडिओला जोरदार प्रतिसाद मिळून तो चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यत 50 हजारपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून दिवसेंदिवस या व्हिडिओला मिळणाऱ्या हिट्सची संख्या वाढत चालली आहे. IFS Sushanta Nanda यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. केवळ 20 सेकंदांच्या या व्हिडिओनं प्रेक्षकांची मनं जिंकली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्राण्यांना भावना असतात, हेच या व्हिडिओतून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे, तर दुसऱ्याने आपला मूड एकदम फ्रेश झाल्याचं म्हटलं आहे.
  Published by:desk news
  First published: