जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालत्या बसमध्ये अशी चढली तरुणी, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

चालत्या बसमध्ये अशी चढली तरुणी, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

व्हायरल

व्हायरल

आजकाल लोकल बस किंवा ट्रेनने प्रवास करणं खूप अवघड झालं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे गर्दी. गर्दीमुळे लोकांना जागा मिळणं कठिण जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जानेवारी : आजकाल लोकल बस किंवा ट्रेनने प्रवास करणं खूप अवघड झालं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे गर्दी. गर्दीमुळे लोकांना जागा मिळणं कठिण जात आहे. एवढंच नाहीतर उभं राहण्यासाठी जागा खूप कमीवेळा मिळते. अशा वेळी बस किंवा ट्रेनमध्ये चढणं खूप धोकायक झालं आहे. एवढ्या गर्दींमध्ये कोणी चेंगरला जावू शकतो. कधी कधी प्रवास जीवावरही बेतला जावू शकतो. अशा परिस्थितीत बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवण्याची धडपड लोक करताना पहायला मिळतात. गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपण करत असलेल्या लोकांचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही मुलगी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. बसमध्ये चढण्यासाठी तिने केलेलं कृत्य पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. बस सुरु झाली असून बसमध्ये खूप गर्दी पहायला मिळत आहे. बसमध्ये चढायलाही जागा नसल्यामुळे मुलीने चक्क खिडकीचा वापर केला आहे, बस सुरु झाल्यानंतर मुलीगी खिडकीतून बसमध्ये चढली आहे. तिला पाहून सगळेच थक्क झाले आहे.

जाहिरात

या व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की, हरियाणा रोडवेजची बस हळूहळू पुढे जाऊ लागली आहे. बसचे मागील व पुढील दरवाजे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अशा स्थितीत प्रवाशांना तेथून चढणे अवघड झाले. दरम्यान, एक तरुणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. खिडकीच्या आत काही व्यक्ती आधीच बसलेले आहे. आत बसलेली व्यक्ती मुलीचा हात धरते आणि तिला बसमध्ये खेचते. ती मुलगीही कसेतरी पाय वर करते आणि पटकन खिडकीतून बसमध्ये शिरते. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, मुलीच्या हिंमतीची सगळेच दाद देत आहेत. मात्र असा स्टंट करणं खूप धक्कादायक असून जीवावरही बेतू शकतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ फिरत असून यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात