मुंबई, 1 ऑगस्ट : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जेसीबी मशीनने तोडफोड करताना दिसत आहे. त्या माणसाने रागाच्या भरात खूप गदारोळ माजवला. हा व्हिडीओ तुर्कस्तानातील कोळसा खाणीतील आहे. जेथे पगार न मिळाल्याने एका कर्मचाऱ्याने संतप्त होऊन जेसीबीने वाहने फोडण्यास सुरुवात केली. हकन एम असे या व्यक्तीचे नाव असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, कोळसा खाणीत काम करणारा हा व्यक्ती अत्यंत रागात दिसला. ज्यावेळी त्याच्या बॉसने त्याला पगार देण्यास नकार दिला. हा बॉस दुसरा कोणी नसून त्या व्यक्तीचा काका आहे. मात्र पगार मिळणार नाही म्हणून या व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात जेसीबीने पाच ट्रक फोडले. तुर्कस्तानच्या सिरनाक प्रांतातील खाणीजवळील ही घटना आहे.
When the Boss refuses to pay up pic.twitter.com/Bw7LeQVglW
— Best Videos 🎥🔞 (@_BestVideos) September 14, 2021
हकन यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने अनेक ट्रक अक्षरश: चिरडले. त्यावेळी मात्र तेथे काम करणारे कर्मचारी घडलेल्या प्रकारामुळे चकीत झाले. नेमकं काय होतंय याची त्यांना कल्पनाच नव्हती. मात्र धावपळ करत काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. हकन चिडला होता आणि गाड्या फोडत होता. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची समजूत काढली. खूप समजावून सांगितल्यावर हकन शांत झाला. मात्र तोपर्यंत त्याने अनेक ट्रकचे मोठे नुकसान केले होते.