मुंबई, 07 मार्च : मुंगूस-साप, मांजर-कुत्रा, वाघ यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हत्ती हा सगळ्यात बलाढ्य आणि शक्तीशाली बुद्धीमान प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. लांब सुळे असलेल्या या हत्तीनं समोरून येणाऱ्या म्हशीच्या पिल्लावर म्हणजेच रेडकूवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघांमध्ये लढाई सुरू झाली. म्हशीसमोरच ही लढाई सुरू होती. या छोट्याशा रेडकूनं हत्तीला अगदी नाकीनव आणल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओ एका वन अधिकाऱ्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 04 मार्चला शेअर करण्यात आला होता.
य़ा व्हिडीओला आतापर्यंत 9 हजार 900 लोकांनी लाईक केलं आहे. दोन हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत तर रिट्वीटही अनेक लोकांनी केलं आहे. युझर्सनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
Loving elephant knows about family and doesn’t want to hurt another’s baby. Sweet gesture if you ask me.
खट्याळ असणाऱ्या छोट्या रेडकूनं या हत्तीलाच पळवलं आणि त्याची दमछाक करत या लढाईत विजय मिळवला. युझर्सनेही असा व्हिडीओ दुर्मीळ पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे.