फ्लोरिडा, 07 जून: प्रेम (Love) ही अतिशय सुलभ भावना असते. प्रेयसी किंवा प्रियकराकडे प्रेम व्यक्त करणं, प्रपोज करणं हे खरं तर खूप खास असतं. प्रेमाची कबुली देण्याचा किंवा प्रपोज (Propose) करण्याचा क्षण अविस्मरणीय व्हावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण विशेष नियोजन करत असतो. सध्या असंच एक कपल (Couple) जोरदार चर्चेत आहे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रेयसीला (Girlfriend) लग्नाकरिता प्रपोज करण्यासाठी प्रियकरानं जोरदार तयारी केली. डिस्नेलॅंडमध्ये (Disneyland) त्यानं तिला प्रपोज करण्याचं ठरवलं. त्यानुसार दोघं डिस्नेलॅंडमध्ये गेले. मात्र, दुर्दैवानं प्रपोज करतेवेळी अचानक एक अडथळा निर्माण झाला. यामुळे प्रपोजचा सरप्राईज क्षण हिरावला गेला आणि या कपलला मनस्ताप सहन करावा लागला. डिस्नेलॅंडच्या एका कर्मचाऱ्यामुळे हा सारा प्रकार घडला. `झी न्यूज हिंदी`नं या विषयीची माहिती दिली आहे. जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंड अर्थात प्रेयसीला प्रपोज करण्याचं ठरवता, त्यावेळी तिला सरप्राईज देण्यासाठी पूर्वतयारीवर विशेष लक्ष देता. या सरप्राईजशी निगडित सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. मात्र, प्रपोज करण्याच्या क्षणी कुणी अडथळा निर्माण केला तर सर्व तयारी फिस्कटते. एका कपलच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. एक कपल त्यांच्या जीवनातला विवाहाच्या प्रपोजलचा अविस्मरणीय क्षण अनुभवत असताना डिस्नेलॅंडच्या एका कर्मचाऱ्यानं (Employee) मनोरंजन पार्कमध्ये येत अडथळा निर्माण केला. सध्या या घटनेची क्लिप सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. प्रेयसीला प्रपोज करताना आईनं आपल्या मुलाला अडवल्याचा एक व्हिडिओ या पूर्वी असाच व्हायरल झाला होता.
The happiest place on Earth…unless this loser is on duty pic.twitter.com/Dn0VHwCthx
— WHISTLE UNCUT (@WhistleUncut) June 3, 2022
ही क्लिप Redditor Wasgehtlan ने मूळतः पोस्ट केली आहे. ``या व्हिडिओमधल्या व्यक्तीला ओळखतो,`` असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यूजरनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे, डिस्नेलॅंडच्या कर्मचाऱ्यानं माझ्या सर्वात चांगल्या मित्राचा सुखद क्षण वाया घालवला. कर्मचाऱ्यानं यावेळी या गोष्टींकरिता परवानगी मागण्यास सांगितलं. मात्र डिस्नेलॅंडने या कपलची माफी मागितली आणि आम्ही सुधारणा करू असं आश्वासन दिलं. व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला विवाहासाठी प्रपोज करण्याच्या तयारीत दिसतो. याप्रसंगी तो हातात अंगठी (Ring) घेऊन गुडघ्यावर खाली बसताना दिसत आहे. इथपर्यंत सर्व काही नियोजनानुसार सुरू होतं; पण तेवढ्यात डिस्नेलॅंडचा एक कर्मचारी मंचावर येतो आणि त्या व्यक्तीच्या हातातली अंगठी हिसकावून घेतो आणि कपलला खाली उतरण्यास सांगतो. खाली उतरल्यावर तरुण पुन्हा त्या कर्मचाऱ्याला विनंती करताना दिसत आहे. मात्र, तो कर्मचारी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. तुम्ही हा सर्व प्रकार या ठिकाणी न करता बाहेर जाऊन करा, असं हा कर्मचारी त्या व्यक्तीला सांगताना क्लिपमध्ये दिसत आहे. या सर्व प्रकाराबाबत डिस्नेलॅंडने कपलची माफी मागितली आहे. याबाबत डिस्नेलॅंडच्या प्रवक्त्यानं न्यूजवीकशी बोलताना सांगितलं, ``हा सर्व प्रकार ज्या पद्धतीनं हाताळला गेला, त्याबद्दल आम्ही कपलची माफी मागितली आहे. तसंच आम्ही यात सुधारणा करू असंही त्यांना सांगितलं आहे.``