नवी दिल्ली, 14 जानेवारी : प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही खूप खास असते. मग तो पहिला जॉब असो किंवा पहिलं प्रेम. कोणतीही पहिली गोष्ट ही कायमच आठवणीत राहते. अशातच आयुष्यातील पहिलं प्रेम हे खूप खास असतं. ही भावना नेहमची स्पेशल असते. पहिल्या प्रेमातील पहिला किसदेखील खूप खास आणि स्पेशल असतो. कायमच आठवणीत राहणाऱ्या क्षणांपैकी हा एक असतो. मात्र काही लोकांसाठी हा खास क्षण स्पेशल न राहता काही कटू आठवणी लक्षात राहतात. असाच काहीसा प्रकार एका मॉडेलसोबत घडल्याचं समोर आलंय. हा प्रकार ऐकून तुम्हालाही थक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
तुर्की मॉडेलच्या जोडीदाराने उत्साहाच्या भरात तिला एवढ्या जोरात किस केलं की तिची जिभ कापली गेली. तिनं स्वतःनंच याविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. 34 वर्षांची तुर्की मॉडेल सेडा एरसोय हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सांगितले की ती पहिल्या डेटला गेली होती. फ्रेंच किस दरम्यान दोघेही प्रेमात पडले. तिच्या जोडीदाराने उत्साहाच्या भरात इतका जोरदार KISS घेतला की तिची जीभ कापली गेली. सर्व रक्त रक्त झाले आहे. मला रुग्णालयात दाखल करावे लागले. शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली. सेदा म्हणाली, कदाचित मी पहिली व्यक्ती आहे जिची चुंबन घेताना जीभ कापली गेली होती. हा विनोद नाहीये याचा खूप त्रास होतो.
View this post on Instagram
सेडाच्या जिभेचे ऑपरेशन पार पडले असून डॉक्टरांनी जिभेला टाके टाकले आहेत. डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. सेडाने चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केल्याबदद्ल त्यांचे आभार मानले आहेत.
सेडा एरसोय ही तुर्कीची मॉडेल आहे आणि ती तुर्की 2010 मिस फोटोमॉडेल स्पर्धेची विजेती आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 620,000 फॉलोअर्स आहेत. तिची बहीण इसरा, 37, देखील एक इंस्टाग्राम स्टार आहे. ज्याचे 398,000 फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत अनेकांचं लक्ष वेधत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Model, Top trending, Viral