जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विमानातील जेवणात प्रवाशाला आढळली भलतीच वस्तू, संतापताच कंपनीने दिलं हे उत्तर....

विमानातील जेवणात प्रवाशाला आढळली भलतीच वस्तू, संतापताच कंपनीने दिलं हे उत्तर....

व्हायरल

व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक हैराण करणाऱ्या वेगवेगळ्या घटनाही समोर आल्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक हैराण करणाऱ्या वेगवेगळ्या घटनाही समोर आल्या. यामध्ये काही चांगल्या घटना तर काही वाईट घटना पहायला मिळाल्या. त्यामुळे आजकाल विमानाने प्रवास करण्यासाठीही लोक विचार करत आहेत. अशातच विमानात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रिया सांगवान नावाच्या एका महिलेने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत एअर इंडियावर आरोप केले आहेत. या पोस्टद्वारे सर्वप्रियाने सांगितले की, एअर इंडियाने प्रवास करताना तिला दिलेल्या जेवणात दगडाचा तुकडा आढळला. जे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने याबाबत फ्लाइटमधील क्रू मेंबरकडे तक्रारही केली होती. त्याचबरोबर फ्लाइटमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणातील निष्काळजीपणावरही तिने तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वप्रियाने ट्विटद्वारे ही माहिती शेअर केली आहे.

जाहिरात

सर्वप्रियाने केलेल्या तक्रारीनंतर एअर इंडियाने याची दखल घेतली. याची दखल घेत एअर इंडियाकडून लवकरच उत्तर देण्यात आले आहे. एअर इंडियाने हे चिंताजनक असल्याचे सांगतिले. ते त्यांच्या केटरिंग टीमसमोर ही बाब ठेवत असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच ही बाब गांभीर्याने घेत केटररवर लवकरच कडक कारवाई करणार आहे. ही बाब त्यांच्यासमोर आणल्याबद्दल एअर इंडियाने सर्वप्रिया सांगवानचे आभार मानले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सर्वप्रियाने तिच्या जेवनाचे आणि दगडाच्या तुकड्याचे फोटो शेअर करताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली. याशिवाय अनेकांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला. एखाद्या कंपनीच्या फ्लाईटमध्ये असं काही घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापहिलेही असे अनेक प्रकार समोर आले आहेत आणि कंपनीने याची दखल घेत माफी मागितली आहे. याविषयीचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात