जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इथं पोलीस झाले केबीसीचे अमिताभ बच्चन, वाहतूक नियम मोडणाऱ्यांची घेतात 'शाळा'!

इथं पोलीस झाले केबीसीचे अमिताभ बच्चन, वाहतूक नियम मोडणाऱ्यांची घेतात 'शाळा'!

इथं पोलीस झाले केबीसीचे अमिताभ बच्चन, वाहतूक नियम मोडणाऱ्यांची घेतात 'शाळा'!

पोलिसांनी वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी आणि नियम तोडणाऱ्यांना धडा शिकवण्याचा नवा मार्ग शोधला आहे.

  • -MIN READ Local18 New Delhi,New Delhi,Delhi
  • Last Updated :

सौरभ तिवारी (बिलासपूर), 04 एप्रिल : देशभरात वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी ट्रॅफिक पोलीस वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. दरम्यान छत्तीसगढमधील बिलासपूर पोलिसांनी लोकांना वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी आणि नियम तोडणाऱ्यांना धडा शिकवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. बिलासपूरमध्ये पोलीस आता चौकाचौकात शाळा उभारून लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देत आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या व्यक्तीला वाहतूक शाखेत थांबवून बसवले जाते. त्यानंतर त्याला ट्रॅफिकशी संबंधित प्रश्न विचारले जातात, जर त्या व्यक्तीने योग्य उत्तरे दिली तर त्याला चालानशिवाय सोडले जाते.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

चुकीची उत्तरे देणाऱ्यांना पुन्हा वाहतूक शाखेत बसवून नियमांची जाणीव करून दिली जाते.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा भांडाफोड, योग शिक्षकाने प्रात्यक्षिकच दाखवलं

या दिवसात पोलीस वाहतूक समस्येला तोंड देण्यासाठी आणि लोकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यासाठी शहरात नवनवीन आणि अनोखे प्रयत्न करत आहेत. नवीन एसपी संतोष सिंग यांनी ड्रग्जच्या विरोधात “निजात अभियान” सुरू करताच ते शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. सिंह यांच्या आदेशानुसार वाहतूक नियमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन पद्धत तयार करण्यात आली आहे.

मार्च 2023 मध्ये, एसपींच्या आदेशानंतर, लोकांना रहदारीबद्दल जागरुक करण्यासाठी शहरातील विविध चौक चौकात सतत वाहतूक शाळा सुरू करण्यात आली. यामध्ये ये-जा करणाऱ्यांसाठी वर्ग आयोजित करून त्यांना वाहतुकीचे नियम आणि त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईची जाणीव करून देण्यात आली.

भल्यामोठ्या उंच झाडावर चढून महिला करत होती ‘हे’ काम, काही क्षणात Video व्हायरल  

लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून दिली तरच शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो, असे मत एस.पी.सिंग यांनी व्यक्त केले, त्यामुळे पोलिस सातत्याने नवनवीन पद्धती अवलंबून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात