जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Love Affair: प्रेयसीला गुपचूप भेटत होता प्रियकर, गावकऱ्यांनी पकडलं रंगेहात, मग जे झालं ते...

Love Affair: प्रेयसीला गुपचूप भेटत होता प्रियकर, गावकऱ्यांनी पकडलं रंगेहात, मग जे झालं ते...

प्रेयसीला गुपचूप भेटत होता प्रियकर, गावकऱ्यांनी पकडलं रंगेहात, मग जे झालं ते...

प्रेयसीला गुपचूप भेटत होता प्रियकर, गावकऱ्यांनी पकडलं रंगेहात, मग जे झालं ते...

सारण जिल्ह्यातील भालवाहिया गावात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला लपून छपून भेटत असताना त्यांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रेमीयुगुला सोबत जे केलं त्याची सध्या सर्वत्रच चर्चा सुरु आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छपरा, 27 मे : सध्या छपरा येथील सारण जिल्ह्यात झालेला एक अनोखा विवाह सोहोळा चर्चेचा विषय बनला आहे. प्रेयसीला गुपचूप भेटायला आलेल्या प्रियकराला लोकांनी रंगेहात पकडून जबरदस्तीने दोघांचे लग्न लावून दिले. दोघांचे हे प्रेमप्रकरण बऱ्याच दिवसांपासून सुरु होते. परंतु अनेक दिवस गावकऱ्यांना याचा थांग पत्ता लागला नव्हता. पण जेव्हा या प्रेम प्रकरणाबद्दल त्यांना कळावे तेव्हा लोकांनी प्रेमी युगुलांना पकडून त्यांचे लग्न लावून दिले. ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील पसरा गटातील भालवाहिया गावातील आहे. बिट्टू आणि नीतू या दोघांची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून  झाली होती.  सोशल मीडियावरील संवादादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर चार वर्षे भेटीगाठी सुरू राहिल्या. मात्र त्यावेळी गावातील लोकांना याची माहिती नव्हती. परंतु हे दोघे काही दिवस लपून छापून सतत भेटत असल्याने गावातील काही लोकांना यांच्यावर संशय आला. शुक्रवारी प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी परसा बाजार येथे पोहोचला. तिथे त्यांच्यावर आधीच लक्ष ठेवलेल्या गावकऱ्यांनी त्यांना भेटताच रंगेहात पकडले.

News18लोकमत
News18लोकमत

बिट्टू आणि नितु दोघांनीही कुटुंबीय आणि गावकऱ्यांसमोर प्रेमप्रकरणाची बाब मान्य केली. मग गावकऱ्यांनी दोघांच्या संमतीने बिट्टू आणि नितु या प्रेमी युगुलाचे लग्न गावातील सती मंदिरात लावून दिले. अनोख्या लग्नाची बातमी परिसरातील इतर लोकांना कळताच  शेकडो लोक हा विवाह पाहण्यासाठी मंदिरात पोहोचले. विवाह प्रसंगी नीतू आणि बिट्टू या दोघांनी आनंद व्यक्त करत सर्वांसमोर आयुष्यभर एकत्र राहण्याचा संकल्प केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात