नवी दिल्ली,23 डिसेंबर: कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचं काम हेच त्याची पॅशन (Passion) असतं, ही गोष्ट तुम्हालाही मान्य असेल. जर ती व्यक्ती अगदी मनापासून काम करत असेल तर ती कौतुकास नक्कीच पात्र असते. सध्या अमेरिकेतील (America) एका युवतीनं लोकांना कॉफी सर्व्ह (Serve) करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. ती अंडरगारमेंट्स किंवा बिकिनी (Bikini) परिधान करून लोकांना कॉफी सर्व्ह करते. तिला या कामात कोणतीही अडचण वाटत नसली तरी तिचं वैयक्तिक नुकसान मात्र होत आहे आणि या गोष्टीचं तिला खूप दुःख आहे. `डेली स्टार`च्या वृत्तानुसार, 19 वर्षांची ग्रेसी (Grace) नावाची तरुणी कॉफी सर्व्ह करण्याचं अर्थात बरिस्ताचं (Barista) काम करते. ती स्वतः कॉफी बनवते आणि ग्राहकांना देते. तसेच ती ग्राहकांशी सौजन्यानं वागते. मात्र बऱ्याच पुरूषांना तिच्या कॉफीपेक्षा तिला कसं पटवता (Convince) येईल, यात अधिक रस असतो आणि हिच तिची खरी समस्या आहे. बऱ्याच वेळा ग्रेसीला लोकांच्या अत्यंत वाईट शेरेबाजीला सामोरं जावं लागतं आणि ती अशा ग्राहकांकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. वाईट शेरेबाजी ऐकून येतो राग ग्रेसीचं काम खूप बोल्ड (Bold) असल्यानं आणि तिला अंडरगारमेंटसवरच लोकांना कॉफी सर्व्ह करावी लागत असल्यानं बरेच ग्राहक तिच्याकडं चुकीची मागणी करतात. परंतु, जेव्हा ग्रेसी अशी मागणी नाकारते तेव्हा ग्राहक टिप न देताच निघून जातात. ``मला ही नोकरी आवडते. परंतु लोक जेव्हा माझ्याविषयी अपशब्द बोलतात, शेरेबाजी करतात आणि वाईट विचार करतात तेव्हा मला फार वाईट वाटतं``, असं ग्रेसी सांगते. ``कॉफी बनवणं आणि लोकांशी सुसंवाद साधत त्यांना ती सर्व्ह करणं हे माझं काम आहे. परंतु, माझे कपडे पाहून ग्राहक चुकीची अपेक्षा ठेवतात, यामुळे बिकिनी बरिस्ता या इमेजला तडा जातो``, असं ग्रेसी सांगते.
ओळखीची लोकंही करतात वाईट कृत्य
``कॉफी शॉपमध्ये (Coffee Shop) येणाऱ्या सर्व पुरुषांना वाटतं की पैसे देऊन आपण हिच्यासोबत रात्र घालवू शकतो. परंतु, अशा ग्राहकांना मी नकार देते. माझ्या शाळेतील एका मैत्रिणीचे वडील कॉफी शॉपमध्ये आल्याचं त्यांच्या मुलीला कळू नये, यासाठी मला टिप म्हणून जास्त पैसे देतात. माझ्या प्रोफेशनमध्ये सुंदर आणि मोहक दिसणं गरजेचं असतं. ग्राहकांना माझ्याशी बोलताना चांगलं वाटवं यासाठी मी खूप सकारात्मक आणि एनर्जेटिक आहे, असं दर्शवणंदेखील आवश्यक असतं``, असं ग्रेसीनं सांगितलं.

)







