Home /News /viral /

जगातला पहिला व्यक्ती ज्याने 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानातून हुबेहूब नवा डोळा मिळवला

जगातला पहिला व्यक्ती ज्याने 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानातून हुबेहूब नवा डोळा मिळवला

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा एक डोळा अगदी लहानपणापासूनच खराब होता. या व्यक्तीला 3D तंत्रज्ञानातून (England Man gets 3D Eyeball) नवा डोळा मिळाला आहे.

    शरीर ही आपली खरी संपत्ती आहे. हा अनमोल ठेवा जपण्याची जबाबदारी आपली आहे. शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. शरीरातला एखादा लहान अवयव जरी नसेल, तर शरीर नीटपणे आपलं कार्य करू शकत नाही. यात डोळे (Eyes) हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण दृष्टीशिवाय माणूस अपंग नसला तरी अपंगच असतो. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा एक डोळा अगदी लहानपणापासूनच खराब होता. या व्यक्तीला 3D तंत्रज्ञानातून (England Man gets 3D Eyeball) नवा डोळा मिळाला आहे. विशेष तंत्रज्ञानाद्वारे (Man Gets New Eyeball With 3D Technology) डोळा मिळवणारे ते जगातले पहिले व्यक्ती ठरले आहेत. स्टीव्ह व्हर्जे (Steve Verze) असं या व्यक्तीचं नाव असून ते लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी आपल्या डाव्या डोळ्याची दृष्टी गमावली होती. तेव्हापासून ते प्रॉस्थेटिक आय (Prosthetic Eyes) वापरत होते. दर पाच वर्षांनी तो बदलावा लागत असे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, स्टीव्ह हे पेशाने इंजिनीअर आहेत. सध्या त्यांचं वय 40 वर्षं आहे. आपला कृत्रिम डोळा पाहून त्यांना नेहमीच आपल्यातली कमतरता जाणवायची. लोकांशी बोलताना त्यांना संकोच वाटायचा. दरम्यान, स्टीव्ह यांना थ्रीडी प्रिंटेड आयबॉल (3D Printed Eyeball) संदर्भात माहिती मिळाली. त्यांनी मूरफिल्ड आय हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून घेतलं. आता त्यांना नवीन डोळा मिळाला आहे. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं आहे. थ्रीडी प्रिंटेड आयबॉलमुळे त्यांचा डोळा अगदी खराखुरा वाटतो. त्यांची दृष्टी परतलेली नाही; पण आता त्यांना दुसऱ्यासमोर लाजिरवाणं वाटत नाही. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे नवीन आयबॉल मिळवणारे ते जगातले पहिले ठरले आहेत. त्यांच्यावरची शस्त्रक्रिया हा क्लिनिकल ट्रायलचा एक भाग होता. इंग्लंडमध्ये सुमारे 60 हजार नागरिक प्रॉस्थेटिक डोळे लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कृत्रिम डोळ्यांमुळे आरशात पाहिल्यावर आपल्याला नेहमी संकोच वाटत असे; पण आता नवीन डोळा आवडला आहे. तसंच 3D तंत्रज्ञानामुळे ते काळानुसार आणखी चांगले होत जातील, असं स्टीव्ह म्हणाले. कृत्रिम डोळे लावल्यानंतर ते योग्यरीत्या सेट होण्यासाठी 6 आठवडे लागतात. थ्रीडी प्रिंटेड डोळ्यांसाठी फक्त 3 आठवडे लागतात. यात डोळे प्रिंट करण्यासाठी अडीच तास लागतात. या प्रक्रियेत डोळ्याची रिकामी खोबणी स्कॅन केली जाते, जेणेकरून सॉफ्टवेअर त्या भागाचा मॅप तयार करू शकेल. यानंतर, बसवण्यात येणारा नवा डोळा हा चांगल्या डोळ्यासारखाच दिसावा, म्हणून चांगला डोळादेखील स्कॅन केला जातो. त्यानंतर डोळ्याचा डिजिटल मॅप जर्मनीला पाठवला जातो. जर्मनीमध्ये ते 3-डी प्रिंटरमध्ये प्रिंट केले जाते. तेथून पुन्हा ते रुग्णालयात पाठवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर थ्रीडी डोळे रुग्णाला बसवण्यात येतात.
    First published:

    पुढील बातम्या