मराठी बातम्या /बातम्या /Viral /बाप-लेकीचं प्रेम पाहून व्हाल भावुक, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

बाप-लेकीचं प्रेम पाहून व्हाल भावुक, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपण आई मुलाचं, आई मुलीच्या नात्याविषयी नेहमीच ऐकलं आहे. मात्र आई मुलाच्या नात्याइतकंच बाप-लेकीचं नातंही खास असतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 21 जानेवारी : आपण आई मुलाचं, आई मुलीच्या नात्याविषयी नेहमीच ऐकलं आहे. मात्र आई मुलाच्या नात्याइतकंच बाप-लेकीचं नातंही खास असतं. बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असतं. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना भावुक करत आहे.

म्हणतात ना बाप-लेकीच्या प्रेमात त्यांचे पैसे, ते कोणत्या घरात जन्माला आले हे मॅटर करत नाही. त्यांच्या आयुष्यातले अगदी छोटे छोटे क्षणही त्यांच्या घट्ट नात्यासाठी पुरेसे असतात. याचंच दर्शन या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरुन होतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, एका व्यक्तीने नवीन सायकल घेतली आहे. तो त्याच्या नव्या सायकलची पूजा करत आहे. शेजारी त्याची छोटी मुलगी दिसत असून ती आनंदाच्या भरात उड्या मारत आहे. बाबांनी घेतलेली सायकल पाहून चिमुकलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ती नव्या सायकलजवळ आनंदात उड्या मारताना दिसत आहे.

बाप-लेकीच्या आनंदाच्या क्षणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांचा भरभरुन प्रतिसादही पहायला मिळत आहे. हेच छोटे छोटे क्षण नातं घट्ट करण्यासाठी मदत करतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद शोधल्यावर नातं टिकून राहतं.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ फिरत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही भावुक करणारे असतात. अनेक विचित्र आणि धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत असतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती दर्शवतात.

First published:

Tags: Daughter, Emotional, Father, Love, Top trending, Viral, Viral news