विजेंद्र कुमार, प्रतिनिधी जींद, 14 जुलै : हरयाणा राज्यातील जींद येते जवळपास 21 वर्षांपूर्वी एक आंदोलन झाले होते. या आंदोलनात एका बैलाने शेतकऱ्यांची खूप मदत केली होती. वीजबील माफ करण्यासाठी कंडेला येथे शेतकरी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी एका बैलाने शेतकऱ्यांची साथ दिली. या बैलाची ताकद इतकी होती की, पोलीस त्याला घाबरुन दूर जात होते. हरियाणाच्या इतिहासात त्या शेतकरी आंदोलनाला कंडेला कांड या नावाने ओळखले जाते. 2002 मध्ये हरियाणात चौटाला सरकार होती. या गावात शेतकरी आंदोलनादरम्यान, पोलिसांनी गोळीबारही केला होता. कंडेला गावातील नागरिक सांगतात की, पोलीस घोड्यावर बसून आले होते. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. पण बैलामुळे कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, या आंदोलनानंतर काही दिवस या बैलाचा मृत्यू झाला.
यानंतर गावकऱ्यांनी त्या बैलाप्रती आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी या बैलाचे मंदिर बांधले. आज या मंदिरात सर्वसामान्य नागरिकांसह राजकारणी नेतेही याठिकाणी येतात. तसेच सर्वजण बैलाची पूजा करतात. कंडेला गावात झालेल्या आंदोलनादरम्यान, सरकारने कंडेलासह पाच गावातील वीज कनेक्शन कापले होते. यानंतर लोकांनी रस्ता जाम केला. पोलिसांनी गोळीबारही केला. पण सुदैवाने यात कुणालाही हानि झाली नाही. यानंतर नगूरां आणि गुलकनी गावात गोळीबार झाला. यामध्ये 8 शेतकऱ्यांचा जीव गेला. मात्र, यानंतर आंदोलन तीव्र झाले. शेतकऱ्यांनी अनेक अभिकाऱ्यांना ओलीस ठेवले. तब्बल दोन महिने कंडेला गावात जींद-चंदीगढ मार्ग बंद राहिला. यानंतर कंडेला गावाला आंदोलनाचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागले. गावकऱ्यांनी या बैलाप्रती आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी बांधलेल्या या बैलाच्या मंदिरात सर्वसामान्य नागरिकांसह राजकारणी नेतेही याठिकाणी येतात. तसेच सर्वजण बैलाची पूजा करतात.