जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : होकारासाठी काय पण! BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज

VIDEO : होकारासाठी काय पण! BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज

VIDEO : होकारासाठी काय पण! BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज

कधी एका मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला हातात BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन प्रपोज केल्याचे एकले आहे? नाही ना.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 22 डिसेंबर: सिनेमामध्ये आणि खऱ्या आयुष्यातही आपण एखाद्या छान ठिकाणी गुडघ्यावर बसून मुलानं मुलीला लग्नासाठी प्रपोज केलेले आपण पाहिले आहे. सर्वांसाठी हा क्षण खास असतो. पण कधी एका मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला हातात BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन प्रपोज केल्याचे एकले आहे? नाही ना. मात्र असा प्रकार बीजिंगमध्ये घडला आहे. चायनामधल्या या मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या होकारासाठी चक्क महागडी गाडी भेट दिली. Xiaojing या 24 वर्षीय मुलीनं आपल्या प्रियकरासाठी एक अनोखे सरप्राईज दिले. त्यासाठी तिनं एक खोलीत फुलांची सजावट केली होती. त्याआधी ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत मॉलमध्ये गेली आणि चक्क लग्नाचे कपडे तिनं त्याला भेट दिले. या दोघांची पहिली भेट ज्या मॉलमध्ये झाली तिथेच तिनं प्रियकराला प्रपोज करण्याचे ठरवले होते. यासाठी तिनं मित्रपरिवार आणि कुटुंबाची मदत घेतली होती. वाचा- Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला घेतो ड्रग्स? रश्मि देसाईच्या आरोपानं खळबळ आशिया वन या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलानं जेव्हा गर्लफ्रेंडला त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रपोज केले होते. याचे उत्तर देण्यासाठी मुलीनं आपल्या प्रियकराला एक पुष्पगुच्छ दिला. या पुष्पगुच्छात BMW गाडीची किल्ली आणि बंगल्याचे कागदपत्रे होते’. वाचा- ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं..

वाचा- बुलेटप्रूफ जॅकेट नव्हे तर खिशातल्या पाकिटामुळे वाचला जीव… मुलीनं बॉयफ्रेंण्डला सरप्राईज दिल्यानंतर तो चकित झाला. लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे वचन दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात