जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : जेव्हा सिंहाच्या तावडीतून मित्रांनी वाचवलं; म्हैशींचा कळप जंगलाच्या राजावर पडला भारी

VIDEO : जेव्हा सिंहाच्या तावडीतून मित्रांनी वाचवलं; म्हैशींचा कळप जंगलाच्या राजावर पडला भारी

VIDEO : जेव्हा सिंहाच्या तावडीतून मित्रांनी वाचवलं; म्हैशींचा कळप जंगलाच्या राजावर पडला भारी

VIDEO पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा कोण शक्तीशाली…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जानेवारी : सिंह (Lion) हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याची गर्जना इतकी जोरदार असते की ती 8 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू जाते. सिंह 36 फुटांपर्यंत उडी मारू शकतो हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल. ते आपली शिकार क्षणार्धात पकडतात. म्हणूनच तर त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ (Viral Videos) पाहिले असतील, ज्यामध्ये सिंह शिकार करताना दिसतो. त्याच्यासमोर मोठमोठे प्राणीही उभे राहू शकत नाहीत. सोशल मीडियावर सिंहाच्या शिकारीचा असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही सिंह एका मोठ्या म्हशीची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने म्हशीची शिकार केलीच होती, पण नंतर अचानक काही म्हशी त्यांच्या साथीदाराला मदत करण्यासाठी तिथे पोहोचल्या. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात सिंहांचा कळप कसा म्हशीवर तुटून पडला आहे, काही जण तिला समोरून तर काही मागून धक्का देत आहेत. त्याचवेळी एक सिंह म्हशीच्या पाठीवर बसतो. यादरम्यान, म्हैस त्यांच्यापासून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु अखेरीस सिंहांनी तिला पकडले.

जाहिरात

त्याचा साथीदार अडचणीत असल्याचे पाहून एक म्हैस तेथे धावत येते आणि सिंहांना उचलून मारते. हे दृश्य पाहताच बाकीचे सिंह लगेच तिथून पळू लागतात. यानंतर आणखी काही म्हशी धावत तेथे पोहोचतात आणि सिंहांच्या नाकी नऊ आणतात. शेवटी सिंहांना आपली शिकार सोडून पळून जावे लागते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाही, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर raze.baghahh या आयडीने शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात