विमानानं प्रवास करणं हे सर्वात जास्त सुरक्षित मानलं जातं. विमानाची सुरक्षा इतर वाहतुकींच्या पर्यायांपेक्षा जास्त काटेकोरपणे पाळलेली असते. तरीही विमान दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ किंवा बातम्या आपण रोज ऐकतो. मात्र सोशल मीडियावर एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. विमान टेकऑफ करत असताना त्याचं चाक तुटलं आणि अशा अवस्थेत विमानानं उड्डाण केलं. हा व्हिडिओ विमानात बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर कॅप्शनसह शेअर केला आहे. सोशल मीडियावर ह्या video मुळा विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत किती सुरक्षा बाळगली जाते असा सवालही उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ एअर कॅनडा एक्सप्रेस फ्लाइट (Air Canada Express Flight) चा असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल. सुरुवातीला या चाकांमधून ठिणगी उडाली आणि त्यानंतर चाक विमानापासून वेगळं झालं. विमानातील प्रवाशाच्या कॅमेऱ्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. ही घटना रनवेवरून विमान टेक ऑफ करत असताना घडली.
Bon bah là j’suis actuellement dans un avion qui vient de perdre une roue...
— том (@caf_tom) January 3, 2020
2020 commence plutôt bien 🤔 pic.twitter.com/eZhbOJqIQr
‘मी सध्या अशा विमानात आहे ज्याची चाकं तुटली आहेत. 2020 ची सुरुवात चांगली झाली.’ असं कॅप्शन असलेला TOM नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून 4 जानेवारी रोजी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत एक हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केली आहे. दरम्यान विमानाची नीट तपासणी आणि चाचणी केली जात नाही का? असा संतप्त सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

)







