Home /News /viral /

आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral

आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral

मॅकडोनाल्डच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पाल सापडल्याच्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.

    अहमदाबाद, 25 मे : चालता-फिरता भूक लागली किंवा स्वस्तात मस्त पार्टी करायची असेल तर बहुतेकांचे पाय वळतात ते मॅकडोनाल्डकडे (McDonald’s). इथलं फास्ट फूड खाणं अनेकांना आवडतं. पण याच प्रसिद्ध फास्ट फूड ब्रांडचा संतापजनक असा व्हिडीओ समोर आला आहे. मॅकडोनाल्डच्या कोल्ड ड्रिंकमध्ये चक्क पाल सापडली आहे (McDonald’s Lizard in Drink). अहमदाबादमधील मॅकडोनाल्ड आऊटलेटमधील हा प्रकार आहे. मॅकडोनाल्डमध्ये खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. भार्गव जोशी (Bhargav Joshi)  असं या ग्राहकाचं नाव आहे. जो आपल्या मित्रांसोबत आला होता.  त्याने इथं काही खाण्यासाठी आणि एक कोल्ड ड्रिंक ऑर्डर केलं. सुरुवातीला तो थोडं कोल्ड ड्रिंक प्यायलासुद्धा. अचानक त्याला तो पित असलेल्या कोल्ड ड्रिंकच्या ग्लासमध्ये पाल तरंगत असल्याचं दिसलं (Lizard in Cold Drink Glass). त्याला धक्काच बसला. त्याने याचा व्हिडीओही ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे वाचा - Shocking! अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं 'मृत बाळ'; आईच्या गर्भातच झाला होता मृत्यू भार्गवने सांगितल्यानुसार, त्याने याबाबत मॅकडोनाल्डच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. पण कुणीच दोन-तीन तास याला कुणीच गांभीर्याने घेतलं नाही. त्यानंतर तर स्टाफने पाल पडलेल्या विषारी कोल्ड ड्रिंकऐवजी 300 रुपये रिफंडची ऑफऱ दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अहमदाबाद महापालिकेने याला गांभीर्याने घेतलं. मॅकडोनाल्डला याचा मोठा फटका बसला. आपल्या चुकीची किंमत मोजावी लागली. महापालिका अधिकाऱ्यांनी कोल्ड ड्रिंकचे नमुने घेतले आणि आऊटलेट सील केलं. लोकांची सुरक्षा लक्षात घेता परवानगीशिवाय आऊटलेट पुन्हा खुलं न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्गरमध्ये सापडला होता विंचू याआधी जयपूरमधील एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एका तरुणाला बर्गरमध्ये विंचू सापडला होता. 22 वर्षांचा तरुण आपल्या मित्रासोबत या रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याने काऊंटरवरून दोन बर्गर ऑर्डर केले. त्यातील एक बर्गर मित्राला दिला, तर दुसरा स्वतः घेतला. बर्गरचा पहिला घास खाताच त्याला तोंडात काहीतरी विचित्र गोष्ट आल्याचं जाणवलं. घास बाहेर काढल्यावर तो मेलेल्या विंचूचा भाग असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या स्टाफला याची कल्पना दिली. हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा हॉटेल मॅनेजरच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने बर्गर उघडून त्यातील विंचू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मॅनेजर करत असल्याचं पाहून तरुण आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना बोलावून घेतलं. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजरने तरुण आणि त्याच्या मित्रावर दादागिरी करत त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात केला. हा प्रकार सुरू असतानाच तरुणाची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकारामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकांनादेखील जबर धक्का बसला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Ahmedabad, Food, Gujrat, Lifestyle, Viral, Viral videos

    पुढील बातम्या