नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : अनेक लोक खाण्याचे प्रचंड शौकिन असतात. विविध प्रकारचं खाणं, नवीन काहीतरी ट्राय करणं याची अनेकांना आवड असते. त्यामुळे त्यांना 'फूडी' म्हटलं जातं. खाण्याचे दिवाने असलेले अनेकजण आपल्याला सहज सापडतील. सोशल मीडियावरही खाण्याच्या पदार्थांचे, रेसीपींचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. अशा फोटो व्हिडीओंना नेटकऱ्यांचीही चांगली पसंती असते. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पिझ्झा पहायला मिळत आहे. मात्र तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला आणखी काहीतरी गोष्ट पहायला मिळेल जी हुबेहुब पिझ्झा सारखीच आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक पिझ्झाचं स्लाईस दिसत आहे. मात्र व्हिडीओ पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसले की याचा अर्धा पार्ट पिझ्झा असून दुसरा अर्धा पार्ट पेंटिंग आहे. जी हुबेहुब पिझ्झा सारखीच दिसत आहे. मात्र ती पेंटिंग एवढी हुबेहुब काढली आहे की ती पेंटिंग वाटत नसून खराखुरा पिझ्झाच वाटत आहे.
View this post on Instagram
पिझ्झाचं हे पेंटिंग सध्या चांगलंच व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल होत असलेलं हे पेंटिंग Sergey Artemyev नावाच्या व्यक्तीनं काढलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील अवाक् झाल्याशिवाय राहिले नसाल. फूडी लोकांचं तर या व्हिडीओने नक्कीच मन जिंकलं असेल.
दरम्यान, अशा हटके आणि सुंदर, क्रिएटिव्ह पेंटिंगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खाण्याच्या गोष्टींते पेंटिंग तर खवय्यांना खूपच आवडते. अशा फोटो आणि व्हिडीओंना खूप सारे लाईक्स कमेंट येत असतात. सध्या या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Lifestyle, Pizza, Viral, Viral news