नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जंगलातला प्रत्येक प्राणी त्याच्या क्षमतेनुसार आणि गुणधर्मानुसार वेगळा असतो. त्याची कृती आणि जंगलात राहण्याची पद्धतही वेगळी असते; पण या सगळ्यात एक असा प्राणी आहे जो दिसायला अस्वलासारखा असला तरी तो हिंस्र नाही. त्यामुळे अनेकांना तो खूप आवडतो आणि त्याची प्रत्येक गोष्ट क्षणभर आनंद देऊन जाते. या प्राण्याचं नाव आहे पांडा. पांडा हा खूप गोंडस प्राणी असून, त्याच्या मस्तीचे अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या पांडाचा असाच एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.
@buitengebiede या ट्विटर अकाउंटवरून नेहमीच प्राण्यांशी निगडीत खास व्हिडिओ पोस्ट केले जातात. सध्या पांडाचा असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. पांडा हा खूप आळशी आणि मस्तीखोर प्राणी म्हणून ओळखला जातो. हा प्राणी इतका आळशी असतो, की तो जागेवरच कधी झोपलाय याची त्यालादेखील कल्पना नसते.
कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल
व्हिडिओत दिसतेय पांडाची मस्ती
या व्हायरल व्हिडिओत पांडाची अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळते. हा व्हिडिओ एखाद्या प्राणीसंग्रहालयातला असावा. हा प्राणी एका लाकडाच्या ओंडक्यावर उभा आहे आणि त्याच्यासमोर एका लांब दोरीला एक गोणी लटकलेली आहे. पांडा त्या गोणीला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गोणी गोल फिरत त्याच्या जवळ येताच तो पुढे सरकत ती पकडण्याचा प्रयत्न करतो; पण उडी मारण्याऐवजी पांडा त्याच्या जागेवरून उभा राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो; पण यामुळे तो खाली जमिनीवर पडतो.
The timing of a panda.. 😅 pic.twitter.com/QiwoEwJCiA
— Buitengebieden (@buitengebieden) October 21, 2022
व्हिडिओवर कमेंट्स
या व्हिडिओला 22 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कमेंट करताना एका युझरने हा प्राणी जंगलात कसा राहत असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसऱ्या एका युझरने कुंग फू पांडा या चित्रपटाशी संबंध जोडत हा खरंच ड्रॅगन वॉरियर आहे का असा प्रश्न विचारला आहे. `अशा प्राण्यांना अत्यंत काळजीपूर्वक जंगलात सोडलं पाहिजे. कारण त्याने झाडावरून अशीच उडी मारली असती तर त्यात त्याचा जीवदेखील जाऊ शकतो,` असं तिसऱ्या एका युझरनं म्हटलं आहे. अनेकांनी या पांडाचा हा गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे. एकूणच पांडाचा हा व्हिडिओ नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरला असून, अनेक नेटिझन मनोरंजन म्हणून या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Twitter, Viral video on social media, Zoo