नवी दिल्ली, 23 जानेवारी : प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. मात्र आजकाल लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काहीही करताना दिसून येतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी हटके आणि क्रेझी करुन लोक लक्ष वेधत असतात. मात्र कधी कधी या गोष्टी त्यांच्याच अंगलट येतात. अशीच काहीशी घटना सध्या समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस आगीशी खेळताना दिसत आहे. शेकोटी पेटवलेली असून तो शेकोटीवर इकडून तिकडे उड्या मारत आहे. तेवढ्यात त्याच्या कपडयांवर आग पेट घेते आणि पसरत जाते. मग तो तरुण पळत सुटतो आणि आग विजवण्याचा प्रयत्न करतो. आग काही विजण्याचं नाव घेत नाही मग तरुण त्याचा शर्ट काढून फेकून देतो. मात्र पॅन्ट लागलेली आग तशीच राहते. तो खाली बसून पॅन्टची आग विजवण्याचा प्रयत्न करतो मात्र ती विजत नाही. शेवटी तो पळत जाऊन शेजारी असलेल्या पाण्यात जाऊन उडी मारतो आणि आग विजते.
La danza del fuego pic.twitter.com/43jLTWSkKp
— Profesor Caos (@ProfesorCaos5) January 10, 2023
या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहे. त्यामुळे नको ते स्टंट करण्याचा प्रयत्न केल्यावर काय होतं हे तुम्ही या व्हिडीओवरुन पाहिलंच असेल. मात्र कधी कधी स्टंट जीवघेणाही ठरु शकतो. त्यामुळे नाही तिथे नाही ते स्टंट करु नये हिच शिकवण आपल्याला या व्हिडीओमधून मिळताना दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. असे आगीशी स्टंट करताना सेफ्टीदेखील खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे विनासेफ्टी धोकादायक गोष्ट करणे टाळा. नाहीतर तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media viral, Top trending, Viral, Viral news, Viral video.