मुंबई, 25 मे: सोशल मीडियाच्या जगात अनेक व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. काही व्हिडिओजना युझर्सकडून (Social Media Users) मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यातले अनेक व्हिडिओज विनोदी असतात, तर काही व्हिडिओज भावूक करणारे असतात. व्हायरल होणारे अनेक व्हिडिओज प्राण्यांचे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मांजराचा (Cat) आणि कबुतराचा (Pigeon) आहे. यात मांजर कबुतरावर हल्ला करताना दिसतं (Cat Attacks On Pigeon) आणि नंतर ते आपला निर्णय बदलतं. पुढे जे होतं ते पाहून नक्कीच भावूक व्हायला होतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक मांजर दिसत आहे. त्या मांजरापासून काही अंतरावर एक कबूतर बसलेलं दिसत आहे. मांजर त्या कबुतरावर हल्ला करण्याच्या तयारीत असतं. त्यासाठी ते हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढेदेखील जातं. तोपर्यंत कबूतर कुठलीच हालचाल करताना दिसत नाही. ते एका जागी शांत उभं असतं. मांजर त्याच्यावर हल्ल्याच्या तयारीने जवळ जातं. परंतु कबुतराजवळ जाताच ते आपला निर्णय बदलतं आणि त्याचं चुंबन घेऊन मागे सरकतं. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Awanish Sharan) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलेली कॅप्शन वाचल्यावर आपल्याला नेमकं काय घडलंय याचा उलगडा होतो. “मांजराला कबुतरावर हल्ला करायचा आहे; पण कबूतर आंधळं आहे. ज्या क्षणी मांजराला हे कळतं, तेव्हा ते शिकारीचा विचार बदलतं” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच जण आश्चर्यचकित आणि भावुक होत आहेत. मांजराने आपल्या कृतीतून एक प्रकारे दयेचा संदेश दिल्याचं जाणवतं. या व्हिडिओवर युझर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युझरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, की “वा! मांजराने उत्तम उदाहरण ठेवलं आहे”. दुसऱ्या एका युझरने लिहिलं आहे, की “कदाचित या मुक्या प्राण्यांकडून माणसाला काही शिकता आलं, तर कोणीही अशक्त, अपंग आणि दुर्बलांवर अत्याचार करणार नाही.” आणखी एका युझरने लिहिलं आहे, की “प्राण्यांमध्येही औदार्य आहे. आजच्या काळात माणसांतून मात्र ते लोप पावत चाललं आहे.” एकाने लिहिलं आहे, की “दुर्बलांवर हल्ला करू नये हे प्राण्यांनाही माहीत आहे; पण माणूस एक असा प्राणी आहे जो कोणतीही संधी सोडत नाही.”
The cat wants to attack the pigeon. The pigeon is blind. The moment the cat realises it, she changes her mind. pic.twitter.com/jQxu2NquFz
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) May 25, 2022
काहींनी पूर्ण व्हिडिओ पाठवा अशी विनंतीदेखील केली आहे. काही जणांनी पूर्ण व्हिडिओत कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, असंही म्हटलं आहे. ‘प्राण्यांना पाठलाग करून शिकार करायला आवडते. कबूतर उडालं नाही, त्यामुळे मांजराने हल्ला केला नाही,’ असा तर्कही एकाने मांडला आहे. जेवढे कुत्रे प्रेमळ आणि दयाळू असतात, तेवढी मांजरं नसतात, असंही काही जणांनी लिहिलं आहे. “प्राणी माणुसकीने वागत आहेत आणि माणसं प्रण्यांसारखे होत चालले आहेत,” असंही एकाने लिहिलं आहे. हा व्हिडिओ अवनीश शरण यांनी 25 मे रोजी सकाळी 9:03 वाजता शेअर केला आहे. 12 तासांच्या आतच व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तो आतापर्यंत 2 हजारांहून अधिक जणांनी रीट्विट केला आहे.