Home /News /viral /

VIDEO : कोरोना योद्ध्यांचा क्रूर चेहरा; विनामास्क दिसला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांनी पायाखाली ठेवलं दाबून

VIDEO : कोरोना योद्ध्यांचा क्रूर चेहरा; विनामास्क दिसला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांनी पायाखाली ठेवलं दाबून

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

    लखनऊ, 24 जून : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोना योद्धा मानल्या जाणाऱ्या पोलिसांचा क्रूर चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे. सुशांत गोल्फ सिटीतील खुर्दरी बाजारात वाहनांची तपासणी करीत असताना हेल्मेट आणि मास्क घातला नसल्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर भडकले. ते इतके चिडले की त्यांनी भररस्त्यात तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. ते मारहाण करीत असतानाचा एक व्हिडीओ तेथे हजर असणाऱ्यांनी शूट केला. त्यानंतर नेमका प्रकार समोर आला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इन्स्पेक्टरने पायाखाली तरुणाला दाबून ठेवलं आहे. बराच वेळ झाला तरी ते तरुणाला सोडत नव्हते. पायाखाली तरुण ओरडत, विव्हळत होता, मात्र पोलिसांनी त्याचं एक ऐकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टरने तरुणाला मारहाण केली आणि बराच वेळ त्याला पायाखाली दाबून ठेवलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी दक्षिणी रवी कुमार यांनी सब इन्स्पेक्टर संजय शुक्ला आणि शिपाई दिनेश, राजेश कुमार यांना निलंबित केलं. हे ही वाचा-Shocking Video : सायकलवरुन पडला तर मागून येणाऱ्या कारने अंगावर घातली गाडी कोरोना काळात अनेक कोरोना योद्धे नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले. पोलीस, डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर होते. मात्र काही पोलिसांच्या दुष्कृत्यामुळे अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक पोलिसांच्या वागणुकीवर टीका करीत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona hotspot, Mask, Shocking video viral

    पुढील बातम्या