जाहिरात
मराठी बातम्या / Viral / असं कसं झालं! महापौर होऊन सुद्धा 4 वर्ष खुर्चीवर होता आलं नाही विराजमान, काय आहे कारण?

असं कसं झालं! महापौर होऊन सुद्धा 4 वर्ष खुर्चीवर होता आलं नाही विराजमान, काय आहे कारण?

असं कसं झालं! महापौर होऊन सुद्धा 4 वर्ष खुर्चीवर होता आलं नाही विराजमान, काय आहे कारण?

असं कसं झालं! महापौर होऊन सुद्धा 4 वर्ष खुर्चीवर होता आलं नाही विराजमान, काय आहे कारण?

राजकारणात खुर्चीसाठी लढताना तुम्ही अनेक नेत्यांना पाहिलं असेल, पण उत्तराखंडमध्ये असे एक महापौर आहे ज्यांचा साडेचार वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असूनही ते आजतागायत महापौर पदाच्या खुर्चीवर बसलेले नाहीत.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उत्तराखंड, 24 मे : राजकारणात खुर्चीसाठी लढताना तुम्ही अनेक नेत्यांना पाहिलं असेल, पण उत्तराखंडमध्ये असे एक महापौर आहे ज्यांचा साडेचार वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असूनही ते आजतागायत महापौर पदाच्या खुर्चीवर बसलेले नाहीत. साडेचार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तरी त्यांचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा महापौरांना आहे. 2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रामपाल सिंह यांनी भाजपच्या तिकिटावर रुद्रपूर नगरपालिकेतून महापौरपदासाठी निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या वेळी रामपालने जनतेला वचन दिले होते की आपण महापौर झाल्यास सरकारच्या माध्यमातून नझुल जमिनीचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ.  रामपाल यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जनतेचा भाजप उमेदवार रामपाल यांना पूर्ण पाठिंबा मिळाला आणि  2018 च्या महापालिका निवडणुकीत 51,000 हून अधिक मतांनी ते विजयी झाले. रुद्रपूर महानगरपालिकाचे महापौर रामपाल सिंह यांनी ‘न्यूज 18 लोकल’शी बोलताना सांगितले की, 2018 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी दिलेली 85 टक्के आश्वासने पूर्ण झाली आहेत. 15 टक्के आश्वासने लवकरच पूर्ण होतील. ते म्हणाले की, 2018 मध्ये या भागातील लोकांसाठी सर्वात मोठा मुद्दा नझुल जमीनचा होता. मी माझ्या जाहीरनाम्यातही त्याचा समावेश केला होता आणि निवडणूक जिंकल्यानंतर मी जनतेला वचन दिले होते की, जोपर्यंत मी नझुल जमिनीचा प्रश्न पूर्ण करत नाही तोवर मी महापौराच्या खुर्चीवर बसणार नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे रखडले प्रकरण : रामपाल सिंह  म्हणाले की, राज्यात आमच्या पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढते आणि मीच नझुल जमिनीचा मुद्दा सरकारसमोर मांडला. नझूल जमिनीवर मालकी हक्क देण्यास शासनाने मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे लोकांना मालकी हक्क मिळवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सीएम धामी यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले : महापौर रामपाल यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून जनतेच्या समस्या जाणून घेतल्याचे सांगितले. मला सीएम धामी यांनी आश्वासन दिले आहे की, नझुल जमिनीच्या मालकीची प्रक्रिया लवकरच सुलभ केली जाईल जेणेकरून जनतेला त्याचा लाभ मिळू शकेल. मी नझूल जमिनीबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याने मी गेली साडेचार वर्षे महापौरांच्या खुर्चीवर बसलो नाही, पण सरकार लवकरच हा प्रश्न मार्गी लावेल अशी मला आशा आहे. नझूल जमिनीचा मुद्दा मार्गी लागल्यासच मी महापौरांच्या खुर्चीवर बसेन, असा विश्वास रामपाल यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात