जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : समोरुन येत होती ट्रेन अन् व्यक्ती पळत जाऊन झोपला ट्रॅकवर, थरकाप उडवणारं दृश्य

Viral Video : समोरुन येत होती ट्रेन अन् व्यक्ती पळत जाऊन झोपला ट्रॅकवर, थरकाप उडवणारं दृश्य

व्हायरल बातम्या

व्हायरल बातम्या

आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरुन तरुणाई नाराज होते तर कधी रागात टोकाचं पाऊल उचलते. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून : आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरुन तरुणाई नाराज होते तर कधी रागात टोकाचं पाऊल उचलते. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. लोक कधी काय विचार करतात आणि कधी विचित्र धोकादायक पाऊल उचलतात काहीच सांगू शकत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाने अचानक रेल्वे ट्रॅकवर असं काही केलं की अंगावर काटाच उभा राहिला. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. एक व्यक्ती कमी गर्दी असलेल्या प्लॅटफॉर्मला उभा असल्याचं दिसत आहे. त्याने अचानक केलेल्या कृत्यामुळे तुम्हीही चाट पडाल. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर एकटा उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर तो आजूबाजूला कोणी आहे का हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहतो. मग ट्रेन येण्याची वेळ होताच ही व्यक्ती रुळावर उडी मारते आणि रुळावर डोकं ठेवून पडून राहते. सुदैवाने एका लेडी कॉन्स्टेबलची नजर त्याच्यावर पडते. यानंतर कॉन्स्टेबलने जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारली आणि ट्रेन खाली येण्यापूर्वीच त्या व्यक्तीला तेथून दूर हटवले. हे पाहून आणखी काही लोक कॉन्स्टेबलच्या मदतीसाठी धावून येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जाहिरात

@RPF_INDIA च्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 57 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. लोक महिलेच्या धाडसाचं आणि तत्परतेचं कौतुक करत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकावर असे प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही लोकांनी असे धोकादायक पाऊल उचललं आहे. मात्र काहींना अशा धोकादायनक कृत्यामुळे आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात