आशीष कुमार शर्मा, प्रतिनिधी दौसा, 5 जून : याआधी तुम्ही अनेक विचित्र पत्र व्हायरल होत असल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. बिहारच्या दौसामध्येही एक विचित्र पत्र व्हायरल झाले आहे. दौसा येथे एका तरुणाने तहसीलदारांना अर्ज दिला. पत्रात तरुणाने लिहिले आहे की, आपल्याला घरातील काम करण्यात अडचण येत आहे. यासाठी त्याला पत्नीची गरज आहे. म्हणून त्याला पत्नी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या पत्रात त्यांनी पत्नी कशा प्रकारची असावी, हे देखील नमूद केले आहे. सिकंदरा परिसरातील गंगाडवाडी गावात महागाई निवारण शिबिरात तरुणाने 3 जून रोजी अंगणवाडीत हा अर्ज सादर केला. तरुणाने लिहिले की, त्याला अशी पत्नी हवी आहे जी पातळ, गोरी, 30 ते 40 वयोगटातील आणि घरातील कामात निपुण असावी. कल्लू असे या तरुणाचे नाव आहे.
लेखपाल यांच्याकडे या तरुणाचा अर्ज आल्यावर त्यांनी याप्रकरणी पंचायत स्तरावर टीम तयार करण्याचा सल्ला दिला. आता कल्लूचे हा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचबरोबर प्रशासनाने एक टीम तयार केली असून, हल्का लेखपाल यांनी आपला अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे.
विशेष म्हणजे, तरुणाने दिलेला अर्ज तहसीलदारांनी पुढील आवश्यक कारवाईसाठी लेखपाल यांच्याकडे पाठविला आहे. सध्या तरुणाने दिलेल्या अर्जावर तहसीलदारांनी मार्किंग आणि फॉरवर्ड करण्याची प्रत आणि लेखपालाच्या अहवालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जो चर्चेचा विषयही होत आहे. या तरुणाला लवकरात लवकर पत्नी उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश तहसीलदार यांनी ग्रामपंचायत अधिकारी पटवाकरी यांना दिले आहे. तर दौसा जिल्ह्यातील या विचित्र प्रकरणानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून हा हास्यास्पद विषय ठरत आहे. पत्र न वाचताच तहसीलदारांनी पटवारींना पथक तयार करण्याचे आदेश कसे दिले, असे लोकांचे म्हणणे आहे. या आदेशानंतर या संपूर्ण घटनेमुळे दौसा प्रशासनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.