जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Titanic submarine : 17 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती टायटॅनिक पाणबुडीची भविष्यवाणी? 2006 सालातील 'तो' VIDEO VIRAL

Titanic submarine : 17 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती टायटॅनिक पाणबुडीची भविष्यवाणी? 2006 सालातील 'तो' VIDEO VIRAL

टायटॅनिक पाणबुडी

टायटॅनिक पाणबुडी

टायटॅनिक पाणबुडीची भविष्यवाणी सांगणारा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 22 जून : शेकडो वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी 5 अब्जाधीशांना घेऊन निघालेली टायटॅनिक पाणबुडी अपघाताची शिकार ठरली. यावरील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात टायटॅनिक पाणबुडीच्या दुर्घटनेची भविष्यवाणी 17 वर्षांपूर्वी 2006 सालीच करण्यात आली होती, असा दावा केला जातो आहे. टायटॅनिक पाणबुडी दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एका अॅनिमेटेड टीव्ही शोचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. 2006 सालचा हा शो आहे. ज्यात टायटॅनिक पाणबुडीसारखीच दुर्घटना घडली आहे.  त्याची तुलना आता प्रत्यक्षात घडलेल्या दुर्घटनेशी केली जात आहे. हा ही भविष्यवाणी होती असा दावा केला जातो आहे.

News18लोकमत
News18लोकमत

टीव्ही शोच्या 17 व्या सीझनच्या 10 व्या भागातील हे दृश्य. ‘होमर्स पॅटर्निटी कुट’ असं या भागाचं नाव होतं. यामध्ये हॅमर सिम्पसनचे वडील मेसन फेअरबँक्स आपल्या मुलासोबत समुद्रात जाण्यापूर्वी भाषण देतात. त्यानंतर ते दोघंही पाणबुडीतून समुद्रात जातात. पाणबुडी समुद्रात अडकते आणि पाणबुडीतील ऑक्सिजन कमी होऊ लागतो. Titan Submersible : बेपत्ता पाणबुडीच्या कंपनीचा CEO, अब्जाधीश बापलेक अन् ब्रिटीश उद्योगपती; कोण होते पाचजण? आता हा व्हिडीओ  सोशल मीडियावर शेअर करत लोक या शोमधील पिता-पुत्राच्या कथेची तुलना पाकिस्तानी व्यापारी आणि त्यांच्या मुलाशी करत आहेत. जे टायटॅनिक पाणबुडीत होते. टायटॅनिक पाणबुडीचं काय झालं? गेल्या काही दिवसांपासून टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्याची चर्चा जगभरात केली जात होती. टायटॅनिक टुरिजमसाठी ओशन गेट कंपनीची पाणबुडी 18 जूनला निघाली होती. पण सुरुवातीच्या काही तासातच संपर्क तुटला होता. तेव्हापासून पाणबुडीचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शोधमोहिम बराच काळ सुरू होती. मॉडर्न सी 130 हर्क्युलस, पी 8 सह 16 एअरक्राफ्टकडून या पाणबुडीचा शोध घेतला जात होता.  त्यानंतर पाणबुडीत स्फोट झाल्याचा आणि त्यातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. Missing submersible Titanic updates : यापूर्वीही टायटॅनिकच्या अवशेषांना दिली होती भेट; त्या पर्यटकांचा कसा होता अनुभव? समुद्रात पाच भागात अवशेष दिसल्याचं कॅनडाच्या जहाजावरील रोबोटच्या शोधातून समोर आलं. ओशनगेट कंपनीकडून सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. टायटॅनिक पाणबुडीचं भविष्य सांगणारा व्हिडीओ

जाहिरात

सध्या पाणबुडीचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी अवशेष आढळून आले असून ते काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अवशेष काढल्यानंतर त्याची तपासणी होईल. त्यानंतरच ठोसपणे काही सांगता येऊ शकेल. 111 वर्षांपूर्वी बुडालं होतं टायटॅनिक जहाज सर्वात मोठं वाफेच्या इंजिनावर चालणारं टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात बुडालं होतं. 111 वर्षांपूर्वी 15 एप्रिल 1922 रोजी ही घटना घडली होती. या दुर्घटनेत 1573 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रशांत महासागरात बुडण्याआधी जहाज 10 एप्रिल रोजी साउदम्प्टनच्या किनारपट्टीवरून निघालं होतं. न्यूयॉर्क सिटीपर्यंत ते जहाज जाणार होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात