मराठी बातम्या /बातम्या /Viral /उंदरांचा त्रास होताय, मग त्यांना न मारता असे पळवा घरातून बाहेर

उंदरांचा त्रास होताय, मग त्यांना न मारता असे पळवा घरातून बाहेर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या उपायाच्या मदतीने घरातील पाहुणे म्हणजे उंदीरमाम दुसऱ्या दिवशीच तुमच्या घरातून निघून जातील. चला मग जाणून घेऊ उपाय

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : अनेक घर उंदरांमुळे ग्रस्त आहेत. कारण एकदा का उंदीर घरी घुसले की बाहेर घ्यायचं नाव घेत नाहीत शिवाय घरातील गोष्टींना उद्भवस्त करतात. तसेच त्यांच्या विष्टेमुळे त्रास होतो. ते वेगळं. उंदीर हा गणेशाचा वाहक मानला जातो. म्हणूनच मंदिरांमध्ये उंदरांची पूजा श्रद्धेने केली जाते. हा गणेशाचा वाहक घरात प्रवेश करतो, तेव्हा मात्र तो नकोसा वाटतो.

    खाण्यापिण्याच्या वस्तुंना हे उंदीर कुडतडतातच शिवाय घरातील इतर वस्तुंची देखील वाट लावतात. अशातच लोक अनेकदा उंदरांना मारण्याचा पर्याय सुचवतात. त्यासाठी मग ग्लू पॅड लावणं, औषध घालणं यासारख्या गोष्टी करतात. पण तुम्हाला आम्ही घरातून उंदरांपासून सुटका करण्यासाठी काही रामबाण उपाय घेऊन आलो आहोत,.

    या उपायाच्या मदतीने घरातील पाहुणे म्हणजे उंदीरमाम दुसऱ्या दिवशीच तुमच्या घरातून निघून जातील. चला मग जाणून घेऊ उपाय

    पेपरमिंट स्प्रे

    उंदरांना पुदिन्याचा किंवा मिंटचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे उंदर जेथे राहातात किंवा घुसतात, त्या जागी पेपरमिंट स्प्रे तुम्ही करु शकता, ज्यामुळे घाबरुन किंवा घुसमटून ते ती जागा सोडून लगेच पळून जातील.

    तंबाखू

    तंबाखू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेचं ते उंदरांसाठी देखील हानिकारक आहे, जर तुम्ही तुमच्या घरातील उंदरांच्या दहशतीमुळे हैराण असाल तर तुम्ही तंबाखूचा वापर करू शकता. यासाठी बेसनात थोडं तूप मिक्स करून उंदर असलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे सर्व उंदीर एकाच वेळी नाहीसे होतील.

    तुरटी

    यासाठी तुरटी पावडरचे द्रावण तयार करावे. मग तुम्ही ही पेस्ट उंदरांच्या बिळाजवळ टाकावी किंवा शिंपडावे. यामुळे सर्व उंदीर ही जागा सोडून स्वतःहून पळून जातील.

    लाल तिखट

    जर तुमच्या घरात उंदीर येत-जात असतील तर ते ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी लाल तिखट टाका. यामुळे उंदीर पुन्हा त्या ठिकाणी येण्याचे धाडस करणार नाही.

    कापूर

    कापूरचा वास आल्यावर उंदरांचा श्वास फुलायला लागतो किंवा त्यांना त्रास होतो. अशा परिस्थितीत कापूरचे तुकडे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे उंदीर अस्वस्थ होऊन घरातून पळून जातात.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle, Social media, Top trending, Viral