जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गड्यानं अंगावर घातलं तब्बल 2 किलो सोनं, अनोख्या शैलीची राज्यात होतेय चर्चा

गड्यानं अंगावर घातलं तब्बल 2 किलो सोनं, अनोख्या शैलीची राज्यात होतेय चर्चा

नरेडला प्रवीण कुमार

नरेडला प्रवीण कुमार

गळ्यात उडत्या गरुडाची सोन्याची प्रतिकृती त्याने परिधान केलेली असून, त्याने एक तावीजही गळ्यात घातलेला आहे.

  • -MIN READ Local18 Telangana
  • Last Updated :

    वारंगल, 18 जुलै : सोन्याचे दागिने परिधान करणं ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याचे दागिने संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानले जातात. सण किंवा विशेष प्रसंगी दागिने भेट म्हणून दिले जातात. सोन्याचे दागिने, नाणी आणि बार खरेदी केले जातात. दागिन्यांना महिलांची पहिली पसंती असते; पण आज आम्ही तुम्हाला अशा पुरुषाबद्दल सांगणार आहोत, जो सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांचा विशेष चाहता आहे. या पुरुषाने आपल्या गळ्यात दोन किलो सोनं परिधान केलं आहे. त्याची ही अनोखी शैली चर्चांचा आणि औत्सुक्याचा विषय ठरत आहे. खरं तर अलीकडे पुरुषदेखील चेन, ब्रेसलेट, लॉकेटसारखे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर परिधान करतात. अशा व्यक्ती समाजात गोल्ड मॅन म्हणून ओळखल्या जातात; पण या व्यक्तीची शैली काहीशी वेगळीच आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नरेडला प्रवीण कुमार असं या व्यक्तीचं नाव असून, तो वारंगल ईगल प्रवीण नरेडला या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म तेलंगणा राज्यात वारंगल इथे झाला. सध्या तो काशीबुग्गा परिसरात राहतो. गळ्यात उडत्या गरुडाची सोन्याची प्रतिकृती त्याने परिधान केलेली असून, त्याने एक तावीजही गळ्यात घातलेला आहे. जेव्हा कोणी नवी व्यक्ती त्याला पाहते, तेव्हा तो अभिनेता असावा आणि जवळच चित्रपटाचं शूटिंग सुरू असावं, अशी शंका येते; पण जेव्हा नरेडला प्रवीण कुमारचं वास्तव समजतं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. नरेडला प्रवीण कुमार 40 वर्षांचा असून तीन मुलांचा पिता आहे; मात्र आपल्या फॅशन सेन्समुळे तो अजूनही तरुण दिसतो. नरेडला प्रवीण कुमार त्याच्या गावात खूप प्रसिद्ध आहे. `मला राजकारणात रस नाही. त्यामुळे मी कधी कोणाच्याही प्रचारात किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये सहभागी होत नाही,` असं तो नमूद करतो. असं असलं तरी शहरातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी त्याचे चांगले संबंध आहेत. `मला लहानपणापासून वाघ, सिंह आणि गरुड हे प्राणी आणि पक्षी आवडतात,` असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. `तुम्ही गरुडाची प्रतिमा गळ्यात का परिधान करता,’ असं विचारल्यावर गरुड पुराणात याबद्दल काही वेधक माहिती सापडल्याचं त्याने सांगितलं. `मला लहानपणापासूनच इतरांपेक्षा काही तरी वेगळं करण्याची इच्छा होती. माझ्या या फॅशनमुळे महिला माझ्याकडे अविश्वासाने पाहत असतात. माझ्या आई-वडिलांना माझी ही फॅशन आवडत नाही; पण माझी पत्नी आणि मुलांना माझ्यावर विश्वास आहे. विविध कार्यक्रम, विवाह समारंभ आणि सहलीसाठीही मला अनेक जण आमंत्रित करतात. मला सन्मान देतात. मला चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या आहेत,` असंही त्याने स्पष्ट केलं. या अनोख्या फॅशनमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळते, हे वेगळं सांगायला नकोच.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात