क्वालालांपूर, 07 जून : एखादी वस्तू अचानक गायब झाली तर चिंता वाटतेच पण ती वस्तू अंडरविअर असेल तर आश्चर्यच वाटेल नाही का? मलेशियातील एका हाऊसिंग कॉलनीतीत असाच विचित्र प्रकार समोर आला आहे. या कॉलनीतील फक्त पुरुषांच्या अंडरविअर गायब होत आहेत. या विचित्र समस्येमुळे इथले लोक वैतागले. अखेर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले. त्यात त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून धक्काच बसला (Thief stealing men underwears). परकच्या कॅम्पर हाऊसिंह कॉलनीत गेले काही दिवस ही विचित्र घटना घडत होती. कॉलनीत फक्त पुरुषांच्या अंडरविअर गायब होऊ लागल्या होत्या. वाळत घातलेल्या अंडरविअर गायब होऊ लागल्याने लोक त्रस्त झाले होते. या कपड्यांमध्ये महागड्या जिन्स-शर्टही होते. पण त्याऐवजी फक्त साध्या अंडरविअर्सच का गायब होत होत्या. याचं नेमकं कारण समजेना. अखेर याचा खुलासा करण्यासाठी म्हणून नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे दृश्य कैद झालं ते पाहून सर्वांना धक्का बसला. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. हे वाचा -
आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकता मध्यरात्री एक व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर मास्क लावून येते. ती गुपचूप एका घराच्या परिसरात घुसते. तिथं घराबाहेर काही कपडे सुकायला घातले आहेत. ही व्यक्ती या कपड्यांजवळ येते आणि त्यातील जेन्ट्स अंडरविअर घेऊन पळून जाताना दिसते. याचा अर्थ एक चोर हे अंडरविअर चोरतो. महागडे कपडे सोडून फक्त अंडरविअरची चोरी करणारा हा चोर कॅमेऱ्यात कैद झाला.
तो एखाद्याच्या घऱात घुसून चोरीचा धोका पत्करत फक्त अंडरविअर चोरी करत असल्याने लोकही हैराण झाले. चड्डीचोराचं हे सीसीटीव्ही फुटेज परक प्रेस फुसबक पेजवर पोस्ट करण्यात आलं आहे. चड्डीचोराचा प्रताप संपूरण जगाने पाहिला आहे. या चोराला अखेर पकडण्यात यश मिळलं आहे. त्याची ओळख काय याचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.