मराठी बातम्या /बातम्या /Viral /बहुतेकांना हवाहवासा वाटतोय हा चोर; चोरीचा हा VIDEO चोरट्याचं होतंय कौतुक

बहुतेकांना हवाहवासा वाटतोय हा चोर; चोरीचा हा VIDEO चोरट्याचं होतंय कौतुक

चोरी करण्याआधी चोराने असं काही केलं की ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

चोरी करण्याआधी चोराने असं काही केलं की ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

चोरी करण्याआधी चोराने असं काही केलं की ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

वॉशिंग्टन, 09 मे : आपल्या घरी चोर यावा असं कुणाला वाटतं किंवा कुणीही कोणत्या चोरट्याचं कौतुक का करेल? पण चोरीचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून बहुतेक नेटिझन्सनाला हा चोर हवाहवासा वाटतो आहे. त्याची चोरी करण्याची स्टाईल पाहून त्याचं कौतुक केलं जातं आहे. चोरट्याने चोरी करण्याआधी जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Thief cuts homeowners lawn grass before stealing lawnmower).

चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Chori video). चोरट्यांच्या चोरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. या चोरट्याचीही चोरी करण्याची पद्धत वेगळी आहे. जे पाहून बहुतेक जण त्याच्यावर फिदा झाले आहेत. अमेरिकेतील चोरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हे वाचा - नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक

टेक्सासमधील ही चोरीची घटना आहे. चोरट्याने बागेतील गवत कापण्याचं मशीन चोरलं आहे. ज्याला लॉनमोअर असं म्हटलं जातं. पण ते मशीन चोरण्याआधी त्याने त्या घराजवळील गवत नीट कापून घेतलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोर्ट आर्थर पोलीस डिपार्टममेंटने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या घटनेची माहिती दिली आहे.

या चोरट्याचं नाव मार्कस हबार्ड असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत पाहू शकता हा चोर घराच्या आसपास असलेलं गार्डनमधील गवत कापताना दिसतो आहे. त्याने घरासमोरील आणि घरामागील दोन्ही बाजूंचं गवत कापलं. त्यानंतर मशीन घेऊन तिथून गायब झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे मशीन नीट चालतं आहे की नाही, हे त्याने तपासलं. मशीन नीट चालत असल्याचं समजताच तो मशीन आपल्यासोबत घेऊन गेला.

पोलिसांनी या घटनेबाबत सांगितल्यानंतर नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी या चोरट्याला मेहनती म्हटलं आहे, तर कुणी त्याच्या या मोठ्या मनाचं कौतुक केलं आहे. एका युझरने या चोराला कुणी ओळखत असेल तर माझ्या घरी पाठवा मी माझं लॉनमोअर तयार ठेवेन. माझ्या घराजवळील गवत ट्रिमिंग कऱण्याची गरज आहे. तर एका युझरने त्याच्या उदार व्यवहाराचं कौतुक करायला हवं असं म्हटलं आहे.

First published:

Tags: Thief, Viral, Viral videos