मुंबई,24 डिसेंबर- मानवी शरीर हे एखाद्या यंत्रापेक्षा कमी नाही. ज्याप्रमाणे यंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शरीराकडे दुर्लक्ष केलं, काळजी घेतली नाही, तर अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. ऑस्ट्रेलियातील उवा तज्ज्ञ (Australia Lice Expert) म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिला डॉक्टरने नुकतीच एका तरुणीशी संबंधित अशी गोष्ट सांगितली की, जी समजल्यानंतर लोक स्वतःचे केस स्वच्छ ठेवण्याबाबत (How to remove Lice?) अधिक जागरूक झाले आहेत.
सिडनी (Sydney) येथील रॅचेल मारून (Rachel Maroun) या उवांची समस्या सोडवणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत. डेली स्टारच्या वृत्तानुसार, रॅचेलने सांगितले की, 'मी अलीकडेच अशी एक केस पाहिली, जी खूप धक्कादायक होती.' तिने एका टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले की, 'एका तरुणीच्या डोक्यात उवा (Lices on Head) झाल्या होत्या. या तरुणीवर उपचार करण्यासाठी मला बोलवण्यात आलं होतं. जेव्हा मी तिचं डोकं पाहिलं, तेव्हा मला धक्काच बसला. कारण एखाद्याच्या डोक्यावरील केसांत (Lice in Hair) मी इतक्या उवा कधीच पाहिल्या नव्हत्या.'
हात लावताच केस गळायचे
रॅचेल पुढे म्हणते, 'त्या मुलीच्या केसांच्या मध्यभागी उवा धावत असल्याचे मला दिसले. त्यांना पाहून असं वाटत होतं, त्यांनी केवळ डोक्यावर घरटेच नव्हे तर संपूर्ण शहर वसवलं आहे. मुलीच्या डोक्यावर इतक्या उवा होत्या की त्या फक्त तिच्या डोक्यातूनच नाही तर कपाळ आणि गळ्यावर येऊनही रक्त शोषत (Lice Sucking Blood) होत्या. उवांमुळे केस खूपच कमकुवत झाले होते. केसांना स्पर्श केल्यावर ते गळून पडत होते. सहसा मी उपचार करताना केसातील उवा या कंगव्याने (Lice Comb) बाहेर काढते. त्यानंतर त्यांना बोटांनी मारते, परंतु त्या मुलीला अगोदरच खूप वेदना होत असल्याने तिच्या बाबतीत,मी हा उपाय करू शकत नव्हते.'
असं केलं उपचार-
'मुलीच्या पालकांना तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यास सांगितले,' असे सांगत रॅचेल पुढे म्हणाली, 'संबंधित मुलीची अवस्था पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टरही चक्रावून गेले, आणि त्यांनी थेट तिचे मुंडण (Lice Treatment) केलं. त्यानंतर तिची उवांपासून सुटका झाली. उपचार करण्यासाठी या मुलीचे डोक्यावरचे केस काढावे लागले आहेत. पण आता ही मुलगी पुन्हा नव्याने केस उगवल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेईल.'दरम्यान, हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलीच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणाऱ्या मुलीच्या पालकांवरही लोक संताप व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.