रशियातील एका अत्यंत श्रीमंत घरातील महिलेने एका वर्षांत 20 मुलांना जन्म दिला आहे. ती आता 21 मुलांची आई झाली आहे. या मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिलेने 16 नॅनींना कामासाठी ठेवले आहे. याशिवाय महिला स्वत:देखील या मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असते. महिलेचं म्हणणं आहे की, तिला आपलं कुटुंब अधिक मोठं करायचं आहे.
23 वर्षांची असताना 21 मुलांची आई झालेली क्रिस्टीना ओजटर्क हिने सांगितलं की, जेव्हा ती आपल्या कोट्यधीश पतीला भेटली तेव्हाच त्यांनी मोठ्या कुटुंबाचं स्वप्न पाहिलं होतं. तिचे 57 वर्षीय पती गॅलीप यांचं पूर्वी एक लग्न झालं होतं. गॅलीपसोबत तिची भेट जॉर्जियाच्या यात्रेत झाली होती.
क्रिस्टीनाने सांगितलं की, 20 मुलांची आई होण्यासाठी तिने सरोगसीची मदत घेतली. एक वर्षांपूर्वीपर्यंत तिला एकच मूल होतं. यानंतर वर्षभरात तिला 20 मुलं झाली. सरोगसीसाठी महिलेने तब्बल 1 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च केला. त्यानंतर तिचं कुटुंब मोठं झालं.
या मुलांची देखभाल करण्यासाठी दाम्पत्याकडे 16 नॅनी आहेत. ज्या त्यांच्यासोबत राहतात. ते वर्षाला नॅनींसाठी 70 लाख रुपये खर्च करतात. क्रिस्टीनाने सांगितलं की, ती सतत आपल्या मुलांसोबत असते. एका आईने जे काही करण्याची गरज असते ती ते सर्व करते.
गॅलीप आणि क्रिस्टीना यांच्याजवळ आधीच 6 वर्षांची विक्टोरिया नावाची मुलगी होती, त्यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुस्तफा नावाच्या मुलाने सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला. त्यांनी यासाठी 8 लाखांचा खर्च केला होता.
तीन मजली बंगल्यात राहणाऱ्या या कोट्यधीश कुटुंब प्रत्येक आठवड्याला 20 मोठ्या पॅकेट लंगोट आणि 53 पॅकेट बेबी फॉर्म्यूलाचा वापर करतात. क्रिस्टीनाने द सनला सांगितलं की, सर्व मुलांसाठी आवश्यक वस्तूंसाठी प्रत्येक आठवड्याला 3 ते 4 लाख रुपयांचं खर्च होता.
क्रिस्टीना मुलांचा सांभाळ करण्यात व्यग्र असते. अनेकदा ती नीट झोपही घेऊ शकत नाही. मात्र याचा तिला त्रास होत नाही. कारण याआधीच त्यांनी मोठं कुटुंब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार क्रिस्टीनाचे पती गॅलीप पर्यटन, परिवहन क्षेत्रात काम करतात. ते मूळत: तुर्की आहे.