जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विद्यार्थ्याने परिक्षेत लिहिलं असं काही.... चेक करणाऱ्या शिक्षकाने काढला Video

विद्यार्थ्याने परिक्षेत लिहिलं असं काही.... चेक करणाऱ्या शिक्षकाने काढला Video

व्हायरल

व्हायरल

परिक्षा जवळ येताच अनेक विद्यार्थी अभ्यासावर तुटून पडलेले पहायला मिळतात. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अहोरात्र अभ्यास करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 एप्रिल : परिक्षा जवळ येताच अनेक विद्यार्थी अभ्यासावर तुटून पडलेले पहायला मिळतात. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अहोरात्र अभ्यास करतात. मात्र काही असेही लोक असतात जे परिक्षेचं अजिबात टेन्शन घेत नाही आणि पेपरसाठी जातात. अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची उत्तरपत्रिका पाहून तुमचंही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेली उत्तरपत्रिका चंदिगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याची सांगितली जात आहे. मात्र याविषयी कोणतीही अधिकृतरित्या माहिती नाही. या उत्तरपत्रिकेवर लिहिलेली मुलाची उत्तरं आणि त्यावर शिक्षकाने दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 2 प्रश्नांच्या उत्तरात मुलाने आमिर खानच्या चित्रपटांसाठी एक गाणे लिहिले आहे. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात 3 इडियट्स मधील गिव्ह मी सम सनशाईन… गिव्ह मी सम रेन हे गाणे लिहिले आहे, तर तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात पीके चित्रपटातील गाणे, भगवान है कहाँ रे तू? लिहिले. त्याच वेळी, त्याने शिक्षकांसाठी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर लिहिले, तुम्ही एक अद्भुत शिक्षक आहात. मी मेहनत केली नाही ही माझी चूक आहे. देवा मला काहीतरी प्रतिभा दे.

जाहिरात

या मुलाची उत्तरपत्रिका चेक करताना शिक्षकाने जी प्रतिक्रिया दिली तीदेखील हटकेच होती. शिक्षकाने लिहिलं, आणखी गाणी लिहायला हवी होती. ही कल्पना चांगली वाटतेय मात्र याने मार्क्स मिळणार नाही. या उत्तरपत्रिकेचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ cu_memes_cuians नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं आहे. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पहायला मिळाला.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून व्हिडीओला लाईक्सही मिळत आहे. यापूर्वीही अशा विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात