जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतला भाजीपाला, Video पाहून येईल संताप

विक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतला भाजीपाला, Video पाहून येईल संताप

विक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतला भाजीपाला

विक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतला भाजीपाला

आजकाल लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट फॉलो करतात. शरीर आरोग्यदायी आणि फीट राहण्यासाठी डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या, दूध, कडधान्य खाण्याचा सल्ला देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12  जुलै : आजकाल लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट फॉलो करतात. शरीर आरोग्यदायी आणि फीट राहण्यासाठी डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या, दूध, कडधान्य खाण्याचा सल्ला देतात. मात्र आपण जो भाजीपाला खरेदी करतो तो कितपत चांगला आणि शुद्ध आहे हादेखील मोठा प्रश्न आहे. भाजीपाला ताजा ठेवण्यासाठी काही विक्रेते त्याच्यावर केमिकल टाकतात तर काही लोक पाणी शिंपडत राहतात. काही विक्रेते तर सरळ सरळ ग्राहकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचं काम करतात. असाच एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. भाजीविक्रेता भाजी गटरमध्ये धूत असल्याचा व्हिडीओ सध्या समोर आलाय, हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा तो चर्चेता विषय बनला आहे. पावसाळा सुरु झाल्यावर व्हिडीओ पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भाजीपाला विक्रेता रस्त्यावरील गटारात भाजी धुताना दिसत आहे. हा भाजीविक्रेता त्या गटारात टोमॅटो, मिरच्या आणि इतर अनेक भाज्या टाकून त्याला धुताना दिसतो. आधी हा भाजीविक्रेता टोमॅटो आणि कोबी त्या नाल्यातील घाण पाण्याने धुवून उरलेल्या भाज्यांसह हातगाडीवर टाकतो. हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहे. ही घटना महाराष्ट्रातील भिवंडी येथील आहे. या प्रकरणी आरोपी व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 273 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

हा किळसवाणा व्हिडीओ @igopalgoswami नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवत असून लोक संताप व्यक्त करत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात