जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऑफिसचा एवढा दबाव की व्यक्ती थिएटरमध्येच करु लागला 'हे' काम, Video व्हायरल

ऑफिसचा एवढा दबाव की व्यक्ती थिएटरमध्येच करु लागला 'हे' काम, Video व्हायरल

थिएटरमध्ये काम करताना व्हिडीओ

थिएटरमध्ये काम करताना व्हिडीओ

लोक आपला बराच वेळ ऑफिसचं काम करण्यात घालवतात. लॉकडाऊनपासून ऑनलाईन काम सुरु झालं आणि लोक विविध ठिकाणांहून आपलं काम करताना दिसून येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल : लोक आपला बराच वेळ ऑफिसचं काम करण्यात घालवतात. लॉकडाऊनपासून ऑनलाईन काम सुरु झालं आणि लोक विविध ठिकाणांहून आपलं काम करताना दिसून येतात. लॉकडाऊन संपलं असलं तरीही अद्याप भरपूर कंपन्या घरुन काम देतायेत. असाच एक ऑनलाईन काम करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला जो चक्क थिएटरमध्ये काम करत होता. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधत आहे. बंगळुरूमधील आयटी प्रोफेशनल त्याच्या लॅपटॉपवर थिएटरमध्ये चित्रपट पाहताना काम करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @bangalore.malayalis या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.

News18लोकमत
News18लोकमत

चित्रपट अजून सुरू झाला नसला तरी त्याला थिएटरमध्ये काम करताना पाहून धक्का बसला नाही. त्याच थिएटरमध्ये चित्रपट पाहत असलेल्या कोणीतरी हा क्षण टिपला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आणि ती क्लिप आता व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे बंगळुरूच्या लोकांच्या, विशेषतः तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या जीवनशैलीवर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे, हे वेगळे सांगायला नको. ऑनलाइन शेअर केल्यानंतर, व्हिडिओला सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून 43,000 हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट आल्या आहेत.

जाहिरात

दरम्यान, कॅफे, हॉटेल, पार्क, अशा अनेक ठिकाणी लोक काम करताना दिसून येतात. त्यामुळे असे व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात