नवी दिल्ली, 26 मे : प्रत्येक घरात दूध रोज वापरलं जातं. काहींना गायींचं दूध आवडतं, तर काहींच्या घरी म्हशीचं दूध येतं; पण, कोणी आजारी पडल्यास काही वेळा शेळीचं दूध पिण्याचाही सल्ला दिला जातो. गाय, म्हैस किंवा शेळीच्या दुधात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की असा एक प्राणी आहे की ज्याच्या दुधात व्हिस्की, बिअर किंवा वाईनपेक्षा जास्त अल्कोहोल आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित बसणार नाही. पण हे खरं आहे. या प्राण्याचं दूध प्यायल्यानं नशाही होऊ शकते. कोणता आहे हा प्राणी आणि त्याच्या दुधात किती प्रमाणात अल्कोहोल आढळतं, ते जाणून घेऊयात.
मुख्यत्वे जंगलात आणि कधीकधी कुणाचा पाळीव प्राणी म्हणून आढळणाऱ्या या प्राण्याचं दूध पिणाऱ्या व्यक्तीला नशा होऊ शकते. आम्ही मादी हत्तीबद्दल बोलत आहोत. मादी हत्तीच्या दुधात 60 टक्के अल्कोहोल आढळतं. वास्तविक, हत्तीला ऊस खायला खूप आवडतो. त्याचबरोबर उसामध्ये अल्कोहोल बनवणारे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हत्तीणीच्या दुधात अल्कोहोल मुबलक प्रमाणात आढळतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार हत्तीणीचं दूध मानवी सेवनासाठी योग्य नाही.
दुधातील केमिकल्स माणसांसाठी धोकादायक
काही अभ्यासांनुसार, हत्तीणीच्या दुधात आढळणारी केमिकल्स माणसांसाठी धोकादायक ठरू शकतात. संशोधकांच्या मते, हत्तीणीचं दूध 62 टक्के अल्कोहोलसह डिस्टॅबलाइज्ड होऊ शकतं. अंदाजानुसार, या दुधातील बीटा-कॅसिन, कॅसिन मिशेल राखू शकतं. पण, या पूर्वी ही भूमिका केवळ के-कॅसिनशी संबंधित होती. प्राण्यांच्या दुधात ऑलिगोसॅकराइडचं प्रमाण कमी असतं. दुसरीकडे, माणूस आणि हत्तींच्या दुधात त्याचं प्रमाण अधिक असतं.
उंटांच्या पाठीवरील कुबड्यात खरंच पाणी असतं का? काय आहे यामागील सत्य
हत्तीच्या दुधात लॅक्टोजची पातळी जास्त असते
संशोधनानुसार, आफ्रिकन हत्तींच्या दुधात लॅक्टोज आणि ऑलिगोसॅकराइड्सची पातळी खूप जास्त असते. हे हत्तीणींच्या स्तन ग्रंथीमधील अल्फा-एलए कंटेंटशी जोडलेले असते. मोठ्या प्रमाणात हे स्पेशलाइज्ड कार्बोहायड्रेट सिंथेसिसशी संबंधित आहे, जिथे व्हे प्रोटिन अल्फा-एलए म्हणून काम करते. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वांत संवेदनशील प्राण्यांपैकी एक मानला जातो. तसंच तो माणसापेक्षा अधिक समंजस आणि बुद्धिमान मानला जातो. मात्र, डॉल्फिन हा यापेक्षा जास्त संवेदनशील आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो.
12 ते 18 तास खातात हत्ती
जगभरात हत्तींच्या तीन वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यामध्ये आफ्रिकन सवाना हत्ती आणि आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती तसंच आशियाई हत्ती यांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर 170 हत्तींच्या प्रजाती आढळायच्या. आता पृथ्वीवर हत्तीच्या दोनच प्रजाती उरल्या आहेत. यामध्ये एलिफ्स आणि लॉक्सोडोंटा यांचा समावेश आहे. एका सामान्य हत्तीला दररोज सुमारे 150 किलो अन्न लागतं. म्हणूनच हत्ती दररोज 12 ते 18 तास गवत, झाडांचा पाला आणि फळं खाण्यात घालवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anima, Elephant, Wild animal