गायींच्या कळपात एकट्या बदकानं घेतला पंगा, पुढे काय झालं पाहा VIDEO

गायींच्या कळपात एकट्या बदकानं घेतला पंगा, पुढे काय झालं पाहा VIDEO

गाय आणि बदकाच्या लढाईत कोण जिंकलं पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 30 जून : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी साप-मुगुस लढाई तर कधी साप खारीची लढाई किंवा काहीवेळा तर वाघ-बिबट्यासोबत झालेल्या लढाईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र सध्या तुफान चर्चेत असलेला बदक आणि गायीचा व्हिडीओ पाहिला की नाही?

विनाकारण कुणालाही त्रास न देणारी गाय आणि पाण्यातल्या बदकानं जेव्हा या गायीशीच डोकं लावून पंगा घेतला तेव्हा नेमकं काय घडलं. बरं एक दोन नाही तर गायींच्या कळपात एकट्या बदकानं लढण्याची हिंम्मत दाखवल्यानं सोशल मीडियावर या बदकाचं युझर्सनी तुफान कौतुक केलं आहे. हौसला बुलंद होनाचा चाहिए असंही एका युझरनं म्हटलं आहे. गायींच्या कळपासोबत बदकाची ही रंगलेली लढाय अत्यंत दुर्मीळ असल्यानं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 264.7 हजार लोकांनी पाहिला असून 17 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. 29 जूनला हा व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करण्यात आल्यानंतर 2 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहाणं पसंत केलं. तर 3 हजारहून अधिक रिट्वीट करण्यात आले आहेत. बदकानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर केलं जात आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading