नवी दिल्ली, 17 मार्च : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकवेळा काही एडिटेड कन्टेंटही पहायला मिळतो. बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली गोष्ट नेमकी खरी आहे की खोटी यातील फरक ओळखणं लोकांना अवघड जातं. त्यामुळे सोशल मीडियावर लोक अशा यूनिक गोष्टी करताना दिसून येतात. असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेले फोटो मांजरींचे कपल फोटोशूट आहे. व्हायरल फोटोंमध्ये दिसणार्या दोन्ही मांजरी अतिशय गुबगुबीत दिसत आहेत. त्यांचे कपल फोटोशूट व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेले फोटो पाहून तुम्हीदेखील फोटोंच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.
पांढर्या बर्फाच्या चादरीत केलेले हे फोटोशूट आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. यामध्ये दोन मांजरी नवविवाहित जोडप्याप्रमाणे एकत्र पोज देताना दिसत आहेत. दोघांच्या गोंडसपणाने लोक थक्क झाले. मांजरी एकमेकांना अतिशय प्रेमाने पकडून ठेवलेल्या दिसतायेत. मात्र, मांजरी इतक्या क्यूट दिसत आहे की खरी आहे की खोटी हे लोकांना समजत नाही. त्यामुळे लोक फोटो पाहून संभ्रमातही पडले आहेत.
@kimbingmeiii7 नावाच्या या अकाऊंटवर मांजरींची अशीच गोंडस छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मांजरींचं हे कपल फोटोशूट सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. या पोस्टवर खूप कमेंटही येत असून अनेकांनी या फोटोंना लाईक्सही केले आहे. फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येत असून काहीजण मांजरींना खोटे असल्याचं म्हटलं आहे तर काहींना मांजरी क्युट वाटल्या. मात्र या मांजरी नक्की खऱ्या आहेत की खोट्या याबाबत पुष्टी झालेली नाही.