अमेरिका, 25 एप्रिल : संपूर्ण जगात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच असते मग तो भारत असो की अमेरिका, बॉलिवूड असो की हॉलिवूड. भारतातही चित्रपट अभिनेते, अभिनेत्री यांच्या खासगी जीवनातील गोष्टींमध्ये लोकांना प्रचंड रस असतो आणि सध्या तर सोशल मीडियामुळे माहितीची देवाण-घेवाण सहज सोपी झाली आहे. हे सांगण्याचं कारण असं की सुप्रसिद्ध अमेरिकी गायिका केहलानी (American Singer Kehlani) हिने एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करून ती लेस्बियन असल्याचं सांगितलं आहे.
झी न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लैंगिकता हा खासगी विषय आहे तो भारतीय समाजात उघडपणे चर्चिला जात नाही पण अमेरिकेत चालतं. लेस्बियन म्हणजे थोडक्यात महिलेशी लैंगिक संबंध ठेवणारी महिला. केहलानीने हा खुलासा करण्यासाठी पोस्ट केलेला व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरील फॅन्स पेजवर प्रचंड व्हायरल होत आहे. केहलानीचे जगभर चाहते आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांना तिच्या लैंगिकतेबद्दल जाणून घेण्याची इच्छा होतीच आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालं.
हे ही वाचा-..म्हणून सारा अली खान अजूनही आहे सिंगल; कोणाला आहे या Love Story तील व्हिलन
कुटुंबाची काय प्रतिक्रिया
केहलानी 25 वर्षांची असून तिनी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात ती एका कारमध्ये बसली आहे. डोळ्यांवर दशकोनी काचेचा डे गॉगल घातलेला आहे आणि ती म्हणते, ‘ मी कोण (लैंगिकता कुठली आहे) आहे हे मला आता कळालंय. मी समलैंगिक आहे, समलैंगिक आहे समलैंगिक आहे.’ तिच्या चाहत्यांनी जसा हा व्हिडिओ पाहिला तसाच तिच्या कुटुंबियांनीही तो पाहिला आणि त्यांनी त्यावर उत्तर दिलंय,‘ आम्हाला माहीत आहे.’
तिच्यातील स्रीत्व आणि पुरुषत्वाबद्दल केहलानी काय म्हणते ?
फीमेल फर्स्ट डॉट को डॉट यूकेच्या वृत्तानुसार केहलानीनी आधीही सांगितलं होतं की आपण स्री आणि पुरुष असल्याची जाणीव तिला आधून-मधून होत असते. तिनी म्हटलं होतं, ‘ मी जेव्हा माझ्या घरात असते तेव्हा मी एक पुरूष आहे असं मला वाटतं आणि मी जेव्हा शांतपणे विचार करते तेव्हा मी स्री असल्याची जाणीव मला होते.’ ती म्हणाली, ‘ मी जेव्हा स्वत: साठी वेळ काढते डोक्याला हेअर मास्क लावते, पाण्यात फुलं घालून स्नान करते. माझ्या शरीराला आरशात बघून निरखते तेव्हा मला वाटतं की मी स्री आहे आणि ती जाणीव प्रचंड सुंदर असते.’
‘माझी स्रीत्वाची भावना माझ्यातल्या हळुवारपणाची जाणीव करून देते आणि पुरूषत्वाच्या भावनेमुळे मी सावध राहते. मला वाटतं या भावनांकडे स्री किंवा पुरुषत्वाच्या मापदंडांच्या आधारे पाहिलं जाऊ नये कारण माझ्या दृष्टीकोनातून हे किरकोळ आहे. पण मी दोन्ही बाबतीत सरळ साधी आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Singer, United States of America, United States Of America (Country), Video viral