मुलं लहान असताना तेव्हा त्यांच्या वागणुकीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. अन्यथा बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. इंग्लंडमधील ससेक्स येथे एका बाळाने सेलमधील बॅटरी गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो सोर्स- डेलीमेल)
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, बाळाचे वडील इलियट लेनन (Elliot Lennon) यांनी बटनाच्या आकाराची बॅटरी गिळली. ज्यानंतर डॉक्टरांनी बाळाची प्रकृती कधीच ठीक होऊ शकत नसल्याचं सांगितलं.
इलियट लेनन (Elliot Lennon) यांनी सांगितलं की, ओलीचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर 28 विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यात एके ठिकाणी त्याच्या हृदयावरही शस्त्रक्रिया करण्यात आली.
इलियट लेनन (Elliot Lennon) यांनी सांगितलं की, जेव्हा ओली केवळ 1 वर्षांचा होता, तेव्हा त्याला काहीही खाण्यासाठी त्रास होत होता. यानंतर आम्ही डॉक्टरांना दाखवलं. सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की त्याला अस्थमा आहे. मात्र एक्स-रे काढल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्याच्या गळ्यात बटनाच्या आकाराची बॅटरी अडकली होती.
इलियट लेनन (Elliot Lennon) यांनी सांगितलं की, 28 विविध शस्त्रक्रियेनंतर ओलीचा जीव वाचवता आला. मात्र त्याच्या शरीरात कास्टिक सोडामुळे झालेल्या नुकसानमध्ये तो खूप आजारी झाला होता. तो कधीच पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही आणि अन्य मुलांप्रमाणे व्यायाम करू शकणार नाही.