'ते राजा दशरथ आणि आम्ही त्यांच्या तीन राणी'; 12 वर्षांचा अनोखा संसार पाहून नातेवाईक हैराण

'ते राजा दशरथ आणि आम्ही त्यांच्या तीन राणी'; 12 वर्षांचा अनोखा संसार पाहून नातेवाईक हैराण

गेल्या 12 वर्षांपासून कृष्णा या तिघींसोबत एकत्र राहतोय. अनेकांना हा संसार पाहून आश्चर्य वाटतं. यावर ते म्हणतात...

  • Share this:

बांदा, 7 नोव्हेंबर : आतापर्यंत तुम्ही अनेक लग्नाच्या कहाण्या वाचल्या असतील. काही यशस्वी होतात तर काही लग्न अर्ध्यातच वाट सोडून देतात. लग्नसंदर्भात हिंदीत एक म्हण आहे..शादीका लड्डू जो खाए वो पचताये और जो ना खाये वो भी पचताये. असाच एक अनोखा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. येथे एक व्यक्ती तीन पत्नींसोबत अगदी गुण्या-गोविंदाने नांदतोय. उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे राहणारे कृष्णा यांच्यासाठी करवाचौथचा सण दरवर्षी अधिक आनंद घेऊन येतो. या दिवशी त्यांच्या तीन पत्नी करवाचौथचा उपवास करतात. आणि पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करतात. कृष्णा यांच्या तीन पत्नी शोभा, रीना आणि पिंकी या सख्ख्या बहिणी आहेत. आणि 12 वर्षांपूर्वी एकाच मंडपात तिघींनी कृष्णाशी विवाह केला होता.

यंदा बुधवारी करवाचौथच्या दिवशी तिघींनी एकत्रित उपवास केला. पूजा-अर्चा केली आणि चंद्राला अर्ध्य देत पतीचं औक्षण केलं. तिघी बहिणी एकाच घरात राहतात. मात्र तरीही या तिघींमध्ये कधीही भांडण होत नाही. शोभा, रीना आणि पिंका तिघींनी बुंदेलखंड विद्यापीठातून एमएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्या म्हणतात त्यांचे पती राजा दशरथ आहेत आणि त्या त्यांच्या राणी. तिघी पत्नींपासून कृष्णाला दोन-दोन मुलंही आहेत. हे सर्वजण काशीराम कॉलनी येथे राहतात.

हे ही वाचा-पती आणि मुलासह सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला; 1000 फूट दरीत सापडला मृतदेह

अनपेक्षितपणे टिकलं नातं

एका नातेवाईकांनी सांगितलं की तिघीही शिक्षित आहेत आणि आपल्या मुलांना चांगल्या वातावरणात वाढवू इच्छितात. हे लग्न इतके वर्ष चालेल याची आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती. मात्र गेल्या 12 वर्षांपासून सर्वजण एकत्र आहेत. कृष्णाने तिघी बहिणींसोबत एकाच मांडवात का लग्न केलं याचा कधीच खुलासा केला नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: November 7, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading