नवी दिल्ली, 18 जुलै : सोशल मीडियावर विविध व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये कधी कोणता व्हायरल होईल आणि चर्चेत येईल काही सांगू शकत नाही. व्हायरल व्हिडीओंमध्ये तुम्ही डान्स व्हिडीओही पाहिले असतील. वेगवेगळ्या स्टाईलचे डान्स लोक करतात. अशाच एक डान्स व्हिडीओ इंटनेटवर आग लावत आहे. मुलीनं आग लावून डान्स केला असून याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकजण आपल्या खास शैलीनुसार डान्स करत असतात. मात्र एका मुलीनं जीव धोक्यात टाकून डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. तिनं घातलेल्या कपड्यांना खालून आग लावत डान्स केला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी डान्स करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिनं तिच्या कपड्यांना खालून आग लावली आहे. आगीचा स्टंट करत ती डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. मुलगी कपड्यांना खालून आग लावून गोल गोल चकरा मारत आहे आणि डान्स स्टेप करत आहे. व्हिडीओ नीट पाहिला तर आग थोडी कपड्यांपासून दूर दिसत आहे.
@finetraitt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. हा डान्स स्टंट भयानक असल्याचं अनेकजण म्हणत आहेत, तर काही जण हा जीवाशी खेळ असल्याचं बोलत आहेत. काहीजण तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, आगीशी खेळतानाचे बरेच स्टंट यापूर्वीही समोर आले आहेत. कधी कधी हे स्टंट लोकांना महागातही पडतात.