नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: गणितासारखा क्लिष्ट विषय एखाद्या भटजीच्या स्टाईलनं शिकवणाऱ्या (Teacher teach mathematics in style of chanting mantra) शिक्षकांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शालेय जीवनापासून ते कॉलेज पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाच्या (Various types of teachers) आयुष्यात अनेक शिक्षक येतात. त्यातील काही पारंपरिक पद्धतीनं शिकवणारे असतात, तर काही शिक्षण देण्याची आधुनिक पद्धत आणि स्टाईल शोधून काढतात. अनोख्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना धडे देऊन त्यांना अभ्यासाची गोडी लावण्यात काही शिक्षकांचा हातखंडा असतो. अशाच एका (Video viral on social media) शिक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मंत्रांच्या स्टाईलमध्ये गणित
एखाद्या लग्नात किंवा पूजेत भटजीनी मंत्र म्हणावा, तशा ढंगात हे शिक्षक विद्यार्थ्यांना गणितातील फॉर्म्युला शिकवत आहेत. एरवी क्लिष्ट वाटणारं गणित हे शिक्षक मजेदार पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. आवाजावरून एखाद्या लग्नसमारंभात तर आपण आलो नाही ना, असा भास अनेकांना होण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी फळ्यावर एक गणित मांडलं आहे आणि ते सोडवताना मंत्रोच्चाराप्रमाणे बडबड करत ते गणित सोडवत आहेत.
विद्यार्थीही करतायत एन्जॉय
विद्यार्थी गणित शिकण्याची ही पद्धत एन्जॉय करत आहेत. मंत्रोच्चाराच्या शेवटी ज्याप्रमाणे स्वाहा या शब्दाचा उच्चार केला जातो, त्याचप्रमाणं विद्यार्थीदेखील प्रत्येक स्टेपच्या शेवटी स्वाहाचा एकत्रित उच्चार करतात आणि वर्गात हशा पिकतो. विद्यार्थ्यांची गणितातील रुची वाढावी आणि त्यांना सोप्या शब्दात ते शिकवता यावं, यासाठीच आपण हा उपक्रम करत असल्याचं शिक्षक सांगतात.
हे वाचा- डिलिव्हरीवेळी लेबर रुममध्ये दीरही राहिल हजर; पतीच्या हट्टामुळे पत्नीचा संताप
करिअर चुकल्याच्या प्रतिक्रिया
लहानपणापासून जेव्हा तुमचं भटजी होण्याचं स्वप्न असतं, मात्र घरचे तुम्हाला शिक्षक व्हायला भाग पाडतात, तेव्हा काय होतं हे या व्हिडिओतून समजत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सन दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू येत असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हारल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Maths, School teacher, Video viral