जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कर्तव्य महत्त्वाचं! भर पावसात फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर निघाला मुंबईतला स्विगी बॉय, पाहा VIDEO

कर्तव्य महत्त्वाचं! भर पावसात फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर निघाला मुंबईतला स्विगी बॉय, पाहा VIDEO

कर्तव्य महत्त्वाचं! भर पावसात फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर निघाला मुंबईतला स्विगी बॉय, पाहा VIDEO

डिलिव्हरी बॉय सफेद घोड्यावर बसून स्विगीची पार्सल बॅग पाठीवर टांगताना दिसत आहे. आता या व्हिडीओचा कमेंट बॉक्स इमोजीसह यूजर्सच्या मजेदार कमेंट्सने भरला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कालपासून सोशल मीडियावर स्विगीच्या डिलीव्हरी बॉयचा (Swiggy Delivery Boy) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असताना स्विगीचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर फूड डिलिव्हरी देताना दिसत आहे. फूड डिलिव्हरीसाठी चक्क घोड्याचा वापर पाहून अनेकांच्या भुवया उंच्यावल्या. म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याने वेगाने पसरला. डिलिव्हरी बॉय घोड्यावरून जेवण देण्यासाठी निघाला असल्याचा हा व्हिडीओ अवघ्या 6 सेकंदाचा आहे. यात एक डिलिव्हरी बॉय सफेद घोड्यावर बसून स्विगीची पार्सल बॅग पाठीवर टांगताना दिसत आहे. आता या व्हिडीओचा कमेंट बॉक्स इमोजीसह यूजर्सच्या मजेदार कमेंट्सने भरला आहे. आता व्हिडीओ व्हायरल झालाय म्हणजे कमेट्सचा पाऊस येणारचं. अनेक यूजर्सन आपली क्रिएटीव्हिटी दाखवत भन्नाट कमेंट या व्हिडीओवर केल्या आहेत. एकाने लिहिलं याला ‘शाही डिलिव्हरी’ म्हणता येईल. डिलिव्हरी बॉय घोड्यावरुन फूड डिलिव्हरीसाठी का निघाला याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आपल्या कामप्रती असलेली त्याची निष्ठा यातून दिसून येतो.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली, भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. संततधार पावसात काळबादेवी आणि सायन भागात इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बाधित इमारतींमधून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , rains , swiggy
  • First Published :
जाहिरात
जाहिरात