नवी दिल्ली, 20 जुलै : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात. दिवसभरात निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ लोक शेअर करत असतात. यापैकी काहीच व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. यामध्ये स्टंट व्हिडीओ लोकांना थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक तरुणी साडी नेसून स्टंट करताना पहायला मिळाली. तरुणीनं समुद्रात काईटबोर्डिंग केली. विशेष गोष्ट म्हणजे तरुणीनं हा स्टंट साडी नेसून केला. त्यामुळे या स्टंट व्हिडीओची चर्चा रंगली आहे. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.
@katyasaini नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीनं साडी घातली आहे. ती समुद्राच्या कडेनं चालत आहे. तेवढ्यात ती स्टंटची तयारी करते. साडी नेसून ती काईटबोर्डिंग करायला लागते. तिचा हा स्टंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अनेकांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तरुणी ज्या पद्धतीनं बिनधास्त होऊन स्टंट करत पाण्यावर उडत आहे हे पाहून तुम्हीही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, असे अनेक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात. मात्र कधी कधी हे स्टंट लोकांनाच महागात पडतात. काहींची फजिती होते तर काहीजण यामध्ये जखमी होतात. कधी हा स्टंट जीववरही येतो.