25 फेब्रुवारी : जगभरात विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात तसंच समुद्रातही लक्षावधी प्रजातींचे जलचर असतात. पण इंडोनेशियामधील (Indonesia) मच्छिमाराच्या जाळ्यात एक दुर्मिळ जातीचा मासा अडकला आहे. समुद्रात (Ocean) मासेमारी करत असताना या मच्छीमाराला (Fisherman) विचित्र दिसणारं शार्क माशाचं पिल्लू आढळून आलं आहे. या माशाचं तोंड हे माणसांसारखं दिसत असून या माशाच्या पिल्लाची खूप चर्चा होत आहे. आम्ही तुम्हाला या माशाच्या पिल्लाविषयी माहिती सांगणार आहोत.
48 वर्षीय अब्दुल्लाह नुरेन (Abdullah Nuren) हे समुद्रात मासेमारी करत असताना त्यांना हे माशाचं पिल्लू आढळून आलं. नुसा टेंगारा प्रांतात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात त्यांना एक मासा आढळून आला. या माशाला आणल्यानंतर त्याला कापले. यावेळी त्याच्या पोटात त्यांना माशाची तीन पिल्ले आढळून आली. यामध्ये दोन माशांचे तोंड हे सामान्य माशाप्रमाणे होते. पण तिसरा मासा पाहिल्यानंतर त्यांना झटका बसला. कारण म्हणजे या माशाचे तोंड हे सामान्य नसून माणसासारखे दिसत होते. जाणकार या प्रकाराला म्यूटेशन म्हणत असून हा मासा खूप प्रसिद्ध झाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना नुरेन यांनी सांगितलं, मादी शार्क (Female Shark) माझ्या जाळ्यात सापडल्यानंतर मी तिला घरी आणून कापलं. परंतु तिच्या पोटातून तीन शार्क पिल्लं निघाली. यामधील दोघे सामान्य शार्कप्रमाणे दिसत होती. तर तिसरं पिलु हे माणसासारखं दिसत होतं. यामध्ये त्याचे डोळे मोठे आणि गोल असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या माशाला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. या विचित्र प्रकारच्या माशाला पाहून अनेकजण चकित झाले आहेत.
दरम्यान, या माशाच्या पिल्लाला पाहून अनेकजण चकित झाले असून याला पाहण्यासाठी लांबून लोकं येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अनेकजण या पिल्लाला खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील नुरेन यांनी सांगितलं. पण नुरेन या पिल्लाला विकणार नसल्याचं आणि स्वतः सांभाळणार असल्याचं म्हटलं आहे. जगात काय आश्चर्य घडेल आणि नियती काय चमत्कार दाखवेल हे सांगता येत नाही. भारतातील पुराणांत आणि जगभरातील प्राचीन साहित्यांमध्ये माणसाचा देह आणि प्राण्याचा चेहरा अशी अनेक उदाहरणं वर्णिलेली आहेत. पण इथं प्रत्यक्षात असं घडल्यावर त्यावर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसलंय. पण विश्वास ठेवायला हवाच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deep ocean, Human face, Pictures viral, Shocking news