Home /News /viral /

नवीन ताऱ्याचा लागला शोध? खगोलशास्त्रज्ञांना अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू

नवीन ताऱ्याचा लागला शोध? खगोलशास्त्रज्ञांना अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू

खगोलशास्त्रज्ञांना एक अशी रहस्यमय वस्तू सापडली आहे, जी दर 20 मिनिटांनी रेडिओ तरंग किरण उत्सर्जित करते.

    मुंबई,27 जानेवारी-  खगोलशास्त्र हा कायमच संशोधनाचा विषय राहिला आहे. अंतराळात घडणाऱ्या नवीन गोष्टींचा आणि बदलांचा शोध घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांचं कायम संशोधन सुरू असतं. खगोलशास्त्रज्ञांना एक अशी रहस्यमय वस्तू सापडली आहे, जी दर  20 मिनिटांनी रेडिओ तरंग किरण उत्सर्जित करते. ही वस्तू खूप जास्त मजबूत चुंबकीय क्षेत्रासह हळूहळू फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्याचा   (Neutron Star)  एक नवीन भाग असू शकते, असा या विश्वास या वस्तूचा शोध लावणाऱ्या टीमला आहे. 2018 च्या पहिल्या तीन महिन्यांत वारंवार यातून सिग्नल (signals)  मिळाले, परंतु नंतर ते गायब झाले. हे सिग्नल्स स्टारक्वेक   (starquake)   सारख्या एकदाच घडणाऱ्या घटनेशी संबंधित होते, असं या सिग्नल्सने सूचित केलंय. इंटरनॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोनॉमी रिसर्चच्या  (International Center for Radio Astronomy Research)  कर्टन युनिव्हर्सिटी (Curtin University ) नोडच्या शोध पथकाचे (research team) नेतृत्व करणाऱ्या नताशा हर्ले-वॉकर म्हणाल्या, "हे खगोलशास्त्रज्ञांसाठी (astronomers ) भीतीदायक होतं कारण अवकाशात असं काहीही नाही, जे अशाप्रकारची लक्षणं दाखवतं." सिग्नलचं स्वरूप असामान्य असलं तरी टीमला असा विश्वास आहे, की हा टेक्नोलॉजीचा (technology) परिणाम नसून एक फिरणारी वस्तू असू शकते. हर्ले-वॉकर म्हणाल्या "हे एलियन (alien) तर नक्कीच नाहीत. टीमने या शक्यतेचा थोडक्यात विचार केला होता, परंतु काही गोष्टी स्पष्ट केल्यावर ती शक्यता नाकारली. त्याचं कारण म्हणजे सिग्नल – जे अवकाशातील सर्वात तेजस्वी रेडिओ स्त्रोतांपैकी एक होते. त्याचा फ्रिक्वेन्सीच्या (frequency) विस्तृत स्पेक्ट्रममध्ये (spectrum) शोध घेता येत होता, याचाच अर्थ की हे सिग्नल्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता होती.” असं म्हटलं जातं की ही वस्तू, आकाशगंगेच्या समतलात सुमारे 4,000 प्रकाश-वर्षे दूर असलेल्या एका काल्पनिक खगोलीय वस्तूशी सुसंगत आहे, ज्याला "अल्ट्रा-लाँग पीरियड मॅग्नेटर" (Ultra-long period magnet ) म्हणतात. जो ब्रह्मांडातील कोणत्याही सर्वज्ञात वस्तूचे सर्वात शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असलेला न्यूट्रॉन ताऱ्याचा (Neutron Star) भाग आहे. हर्ले-वॉकर म्हणाल्या की, "हा एक प्रकारचा हळूहळू फिरणारा न्यूट्रॉन तारा आहे. ज्याच्या अस्तित्वाचा सैद्धांतिकदृष्ट्या अंदाज लावला गेला आहे. पण कोणीही अशा पद्धतीने त्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो तारा इतका तेजस्वी असेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती."अधिक संशोधनाअंती ही अवकाशातील वस्तू आहे का हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा करूया.
    First published:

    Tags: Space, Space star

    पुढील बातम्या