मुंबई, 13 जुलै: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळी चॅलेंज व्हायरल होत आहेत. नुकतच एका झेब्र्याचंही चॅलेंज व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता आणखी एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये शिकारीसाठी दबा धरून बसलेला सिंह शोधण्याचं आवाहन युझर्सना केलं जात आहे. न्यू मेक्सिको, न्यू मेक्सिकोमधील रिओ मोरा नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्यूजमध्ये आजकाल क्लिक केलेले एक चित्र व्हायरल होत आहे. या चित्रात हरीण गवत खाताना दिसत आहे. या फोटोमध्ये हरणाची शिकार करण्यासाठी सिंह झाडांमाध्ये लपून बसला आहे. हा सिंह कुठे आहे हे शोधण्याचं चॅलेंज सोशल मीडियावर युझर्सना देण्यात आलं आहे.
अनेक युझर्सनी यावर एकमेंट्स केल्या आहेत. एक युझर म्हणतो यामध्ये सिंह कुठे आहे हे समजत नाही. तर दुसरा युझर म्हणाला आहे की शोधायला खूप वेळा लागला. तर एका युझरने म्हटलं की मला अगदी सहज जमलं आहे.
अनेकांना हा प्राणी शोधणं खूप कठीण गेलं आहे. पण हे चॅलेंज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
There. pic.twitter.com/1RzZSo1kRX
— CuriousOldSoul (@Curious0ldsoul) July 9, 2020
जर तुम्हाला हा सिंह दिसत नसेल तर तुम्हाला एक छोटीशी हिंट. चित्राच्या उजव्या बाजूला झाडाजवळ पाहा. खाली गवतात सावजाची शिकार करण्यासाठी सिंह लपलेला आहे. तुम्हाला दिसला का सिंह कुठे लपला आहे ते?